*कोंकण एक्सप्रेस*
*यशस्वी कराटेपटूंना प्रमाणपत्रांचे वितरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
कराटे परीक्षेत यश संपादन केलेल्या वेंगुर्ला येथील हळदणकर कराटे ब्रँचच्या २८ कराटेपटूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच वेंगुर्ला हायस्कूल येथे संपन्न झाला.
महाराष्ट्र कराटे संस्थेचे अध्यक्ष अॅन्थोनी कार्निओ यांच्या अधिपत्याखाली वेंगुर्ला येथे कराटे परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यात हळदणकर कराटे ब्रँचच्या तेजश्री लांजेकर, विरश्री भिसे, प्रेरणा आरावंदेकर, प्रतिक भाटकर, अथर्व गावडे, नंदिनी कुमार (व्हाईट बेल्ट), सुजय परब, चेतन पाटील, लक्षिता चौधरी, विहान चौधरी, प्रेरणा आरावंदेकर (रेड बेल्ट), स्वरा सापळे, शुभ्रा राऊळ, निशिगंधा खानोलकर, प्रेरणा आरावंदेकर, अथर्व गावडे, सुजय परब, लक्षिता चौधरी, चेतन पाटील (यलो बेल्ट), सार्थक भाटकर व आराध्य पोळजी (ऑरेंज बेल्ट), भूमि परूळेकर (ग्रीन बेल्ट), मयंक नंदगडकर, स्वदिप उकिडवे, दिव्यांका लटम, निरज खारोल, भूमिका घाडी, (ब्ल्यू बेल्ट), जान्हवी मडकईकर (ब्राऊन बेल्ट) यांनी यश संपादन केले. या सर्वांना वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्गचे संस्थापक डॉ.सचिन परूळकर, भाजपा तालुका महिला सरचिटणीस आकांक्षा परब, पालक सोनल राऊळ तसेच हळदणकर कराटे ब्रँचचे संचालक पुंडलिक हळदणकर आणि प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात कराटेच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या भूमिका घाडी आणि प्रतिक्षा आरोलकर यांनाही गौरविण्यात आले. वरील सर्व कराटेपटूंना पुंडलिक हळदणकर आणि कृष्णा हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले.