अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप

अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप

*कोंकण एक्सप्रेस*

*अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप*

*भक्तीचा जागरही थांबला*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात शनिवारी अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. रात्रौ उशिरापर्यंत ठिकठिकाणी विसर्जन सोहळा सुरू होता. यात काही घरगुती गणपतींसह वेंगुर्ला शहरातील गाडीअड्डा येथील तांबळेश्वर भगवती मित्रमंडळाच्या गणपतीचा समावेश होता.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यातील काही गणपतींचे दीड, पाच, सात, नऊ दिवसांनी विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन ढोलताशांच्या गजरात, फटकांच्या आतषबाजीत संपन्न झाले. हौशी गणेशभक्त १७ किवा २१ दिवसांपर्यंत गणपतीचे पूजन करतात. मात्र, यंदा पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्याने ग्रहणकाळातील पथ्य पाळणे कठीण असल्याने काही गणेशभक्तांनी आपल्या गणपतींचे अकरा दिवसांनी विसर्जन केल्याची चर्चाही होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळनंतर गाडीअड्डा येथे पूजन करण्यात आलेल्या ‘वेंगुर्ल्याच्या राजाची‘ मिरवूणक निघाली. बाजारपेठमार्गे दाभोली नाका, जुना स्टॅण्ड येथून मांडवी खाडी येथे गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तर साकव पूल, चाफाळगा, पत्र्याचे पूल येथे घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. या गणपतींच्या विसर्जनाने गेले दहा दिवस सर्वत्र सुरू असलेला भक्तीचा जागरही थांबला आहे. विसर्जन मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ला पोलिस स्थानकाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!