*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा परिषद उर्दू शाळा धालवली येथे नवीन शिक्षक द्या-धालवली ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीची मागणी*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व धालवली ग्रामस्थांनी घेतली जि.प.च्या शिक्षणाधिकारी यांची भेट*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
तालुक्यातील जिल्हा परिषद धालवली उर्दू शाळा ही इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची गावातील एकमेव उर्दू शाळा असून येथे एक पढवीधर व दोन उपशिक्षक असे तीन शिक्षक कार्यरत होते. जिल्हाअंतर्गत बदली मध्ये धालवली उर्दू शाळेतील तिन्ही शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. या बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर दोनच उपशिक्षक धालवली उर्दू शाळेवर देण्यात आले आहेत. आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व धालवली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद च्या (प्राथमिक) शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. धालवली उर्दू शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात धालवली उर्दू शाळेतील तीन शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली झाल्याने या शाळेला नवीन तीन शिक्षक द्या अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व धालवली ग्रामस्थांच्या वतीने यावेळी करण्यात आली. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मा.शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद धालवली शाळेला नवीन तीन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मुराज सोलकर अल्पसंख्याख तालुका सरचिटणीस, अध्यक्ष मज्जीद सोलकर, उपाध्यक्ष रियाज मालपेकर आदी उपस्थित होते.