*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा बँकेत लिपीक पदांसाठी ऑनलाईन भरती, तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील 73 रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रीया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्युट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविली जाणार आहे. या करीता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर अर्ज मागविणेत येत आहेत.
जिल्हा बँकेच्या भरतीसाठी अर्ज दि.05 सप्टेंबर 2025 पासून दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत उमेदवार यांनी आपली
ऑनलाईन परिक्षा शुल्क दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत स्विकारली जाणार आहे
ऑनलाईन परिक्षा दिनांक: बँकेच्या संकेत स्थळावर अलाहिदा प्रसिध्द करणेत येणार आहे
ऑनलाईन परिक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करणेचा अंतिम दिनांक : बँकेच्या संकेत स्थळावर अलाहिदा प्रसिध्द करणेत येईल.
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक: ऑनलाईन परिक्षा निकालानंतर बँकेच्या संकेत स्थळावर अलाहिदा प्रसिध्द करणेत येईल.
उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परिविक्षाधिन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इत्यादी बाबतची विस्तृत माहिती बँकेच्या www.sindhudurgdcc.com
या संकेतस्थळावर दि.05 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पहायला मिळणार आहे.
उमेदवार सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना वय अधिवास दाखला (Domicile
Certificate) अपलोड करणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर भरणा केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंट मोडव्दारे भरावयाची आहे. अर्जासोबत भरलेले परिक्षा शुल्क ना परतावा (Non Refundable) राहील.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता, स्वतःचा ई-मेल आय.डी., मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे. एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही.
उमेदवारास ऑनलाईन लिंकवर अर्ज भरण्या अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी आयबीपीएस संस्थेच्या CGRS या पोर्टलवर https://cgrs.ibps.in/ नोंदवायची आहे.
प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन तिहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत, सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल,
तरी बँकेच्या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे