*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट व कासार्डे हायस्कूलच्या कुस्तीगिरांनी मैदान गाजवले..*
*कणकवली तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा कासार्डेत संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.*
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि क्रीडा परिषद कणकवली तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ‘रूक्मिणी कृष्ण कुडतरकर नाट्यगृह’ संपन्न झाली.या ठिकाणी झालेल्या विविध गटातील फ्रिस्टाईल कुस्त्यांमध्ये कासार्डे, फोंडाघाट, करूळ,कुंभवडे व कनेडीच्या खेळाडूंच्या कुस्त्या विशेष प्रक्षेणीय झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन कासार्डे विकास मंडळ मुंबईचे मानद सरचिटणीस रोहिदास नकाशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व बलाची देवता हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.तर ऑलम्पिकवीर पै.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या सौ बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे, कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड, पंच अभिजीत शेट्ये, निलेश फोंडेकर,क्रीडा शिक्षक अजिंक्य पोफळे, देवेंद्र देवरुखकर,सौ.वैष्णवी डंबे, स्वप्निल कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्या सौ बिसुरे यांनी शिस्त हाच खेळांचा आत्मा असल्याने नियमाने आणि शिस्तिने खेळ खेळून आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.दरम्यान संजय पाताडे यांनीही मनोगत व्यक्त करून शूभेच्छा दिल्या.
चौकट
*अभ्यास बरोबरच मैदानावर वेळ द्या-* रोहिदास नकाशे
खेळामुळे शालेय जीवनात आत्मविश्वास व धैर्य निर्माण होते,स्पर्धेत जिंकणे-हरणे हे गौण असून तरूणांनी मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यासाबरोबरच मैदानावर वेळ देणे महत्त्वाचे आहे असे आवाहन स्पर्धेचे उद्घाटक सरचिटणीस रोहिदास नकाशे यांनी उपस्थित खेळाडूंना केले.
या कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेला पंच म्हणून अभिजीत शेट्ये अजिंक पोफळे, निलेश फोंडेकर, स्वप्नाली कदम, युवराज राठोड व सानिका मारकड आदींनी कामगिरी पार पाडली.
*14 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये -*
प्रथम -३० कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रिती क्षिरसागर (कासार्डे हायस्कूल),३६कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-धैर्य परब (कासार्डे हायस्कूल), द्वितीय -श्रेया डोर्ले (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट),३९कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम-समृध्दी मराठे ( कासार्डे हायस्कूल)४६कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-कृष्णाई रावराणे (फोंडाघाट हायस्कूल)
*१४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये- -*
३५कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम-ध्रुव शेट्ये ( कासार्डे हायस्कूल), व्दितीय -पार्थ सांडिम- ( फोंडाघाट हायस्कूल), तृतीय – साहिल नकाशे,( कासार्डे हायस्कूल),४८कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम- भावेश नारकर ( कासार्डे हायस्कूल),५७कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम -अव्दैत गिते( कासार्डे हायस्कूल),६२ कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम -ओम ठुकरूल ( कासार्डे हायस्कूल)
*१७वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये-*
४० कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-साक्षी सरवणकर( कासार्डे हायस्कूल), ४३कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम-समिक्षा येंडे, द्वितीय – वैदेही राणे ( दोन्हीही कासार्डे ज्यु.कॉलेज),४६कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम-ऋतुजा चव्हाण,( फोंडाघाट हायस्कूल), रिद्धी परब( कासार्डे ज्यु.कॉलेज),
५७कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम-सृष्टी कोलते- ( कासार्डे ज्यु.कॉलेज),६१कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-अस्मी ठुकरूल( कासार्डे हायस्कूल)
*१७ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये -*
४५कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम-गुरूप्रसाद नाकिल( कुंभवडे हायस्कूल), द्वितीय -ओम राणे ( कासार्डे हायस्कूल), तृतीय – कृपाल चौहान ( फोंडाघाट हायस्कूल),५१कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-सिध्देश सांडिम
( फोंडाघाट हायस्कूल),६० कि.ग्रॅ.खालील वजनगटात- प्रथम -श्रीहरी गिरीबुवा, द्वितीय सुरज शिंदे (दोन्ही फोंडाघाट हायस्कूल), तृतीय -सोहम पाटील ( कासार्डे हायस्कूल),६५कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-आकाश गोंधळी( फोंडाघाट हायस्कूल),७१कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम- किशोर देवासी,द्वितीय – परशुराम राठोड (दोन्ही कासार्डे हायस्कूल),८०कि.ग्रॅ.खालील वजनगटात -जय तोरस्कर ( कासार्डे हायस्कूल),९२कि.ग्रॅ.खालील वजनगटात -मृणाल मुणगेकर ( कासार्डे हायस्कूल)
*ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात-*
४५ कि.ग्रॅ.खालील वजन गटात मध्ये –
अमोल जाधव (कासार्डे हायस्कूल)
४८कि.ग्रॅ.खालील वजन गटात मध्ये –
दुर्वास पवार ( कासार्डे हायस्कूल)
७१कि.ग्रॅ.खालील वजन गटात मध्ये –
प्रथमेश चिखले( फोंडाघाट हायस्कूल)
*१९ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये -* ५०कि.ग्रॅ.खालील वजनगटात -प्रथम- तन्वी पारकर( कणकवली कॉलेज),
५३कि.ग्रॅ.खालील वजनगटात -प्रथम-साक्षी तेली ( कासार्डे ज्यु.कॉलेज),५५कि.ग्रॅ.खालील वजनगटात -प्रथम-नंदिता मत्तलवार ( कासार्डे ज्यु.कॉलेज)५७कि.ग्रॅ.खालील वजनगटात -आसावरी तानवडे( कासार्डे कॉलेज),५९कि.ग्रॅ.खालील वजनगटात -क्षितीजा काळे( कासार्डे कॉलेज)
*१९ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये -*
५७कि.ग्रॅ.खालील वजनगटात-प्रथम-सुरज तिरोडकर (फोंडाघाट कॉलेज), द्वितीय -अजय पवार (कासार्डे कॉलेज), तृतीय -रितेश कदम (राजाराम मराठे कॉलेज फोंडाघाट) व प्रसाद सलाम (कनेडी कॉलेज)६१कि.ग्रॅ.खालील वजनगटात -प्रथम-जतिन चव्हाण (फोंडाघाट कॉलेज), द्वितीय -साहिल शेट्ये ( कासार्डे ज्यु.कॉलेज), तृतीय,-हर्ष कुंभार ( कनेडी कॉलेज)८६कि.ग्रॅ.खालील वजनगटात -विघ्नेश पेडणेकर ( कासार्डे हायस्कूल),९७कि.ग्रॅ.खालील वजनगटात -सर्वज्ञ कुलकर्णी ( कासार्डे कॉलेज)
*ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारामध्ये-*
४८ कि.ग्रॅ.खालील वजन गटात मध्ये -शुभम राठोड ( कासार्डे हायस्कूल)
या यशस्वी खेळाडूमधून प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूं जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी खेळाडूंचे क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा तहसीलदार दिक्षांत देशपांडे,प.स.
कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस व तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.