*कोंकण एक्सप्रेस*
*बाप्पाच्या दरबारात भजने आणि आरत्या बरोबर व्यसनमुक्ती संकल्पाचा जागर*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील खवळे महागणपती ट्रस्ट आणि नशाबंदी मंडळ , व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रम, सामाजिक न्याय विभाग, जि. प. सामाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, नशा मुक्त भारत यांच्यावतीने गणेश भक्तांनी व्यसनमुक्त गणेश उत्सव साजरा करावा ही संकल्पना घेऊन उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा असे आवाहन करण्यात आले . या संकल्पनेचे तारामुंबरी येथील खवळे महागणपती ट्रस्ट कडून स्वागत करून २१दिवसाच्या खवळे महागणपती उत्सवादरम्यान होणाऱ्या आरतीच्या वेळी सर्वांना सामुदायिक व्यसनमुक्तीचा संकल्प घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल आसा निश्चय करून प्रत्यक्षात कार्यक्रमाचे अंमलबजावणी केली. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष मा. सुर्यकांत खवळे यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले या माध्यमातून आशा सामाजिक उपक्रमात नेहमीच आमचा सहभाग राहिल यापुढे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात आम्ही हा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करून व्यसनमुक्ती च्या कार्याला हातभार लावू .
यावेळी बाप्पाच्या आरती व भजनासाठी सहभागी झालेल्या तरूणांनीही बाप्पाच्या साक्षीने व्यसनमुक्त राहून इतरांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला. तसेच या युवावर्गाशी व गणेश भक्तमंडळीशी संवाद साधताना नशाबंदी मंडळाच्या अर्पिता मुंबरकर गेल्या पंधरा वर्षांत व्यसनमुक्तीच्या या कार्यात अनेक शासकीय, नीम शासकीय यंत्रणा , पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, शिक्षण यंत्रणा, निरनिराळ्या सामाजिक संस्था संघटना यांचे सहकार्य मिळत असतेच यापुढे अशा धार्मिक संस्थाचा या व्यसनमुक्तीच्या कार्यात सहभाग असणार आहे ही खूप प्रेरणादायी बाब असून गणपती बाप्पाच्या साक्षीने बाप्पाच्या दरबारात व्यसनमुक्तीचा संकल्प घेवून व्यसनांना धुडकावून लावण्याची ताकद युवकांच्यात निर्माण होईल याची खात्री वाटते असे मत व्यक्त केले. गणपती बाप्पाच्या आरतीनंतर प्रसादा बरोबर व्यसनमुक्ती शपथेचा प्रसाद घेऊन सर्वांनी व्यसनमुक राहून व्यसनमुक्तीच्या कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात नशाबंदी समिती सदस्य मा रंजना कदम, खवळे महागणपती ट्रस्ट चे अध्यक्ष सुर्यकांत खवळे, कार्यवाह अक्षय खवळे, खजिनदार विनय खवळे आणि ग्रामस्थ, युवावर्ग ट्रस्ट मान्यवर सहभागी झाले होते.