एक दिवसाच्या गौरींचे आगमन ; आजही ठिकठिकाणी जपली जातेय ओवसा प्रथा

एक दिवसाच्या गौरींचे आगमन ; आजही ठिकठिकाणी जपली जातेय ओवसा प्रथा

*कोंकण एक्सप्रेस*

*एक दिवसाच्या गौरींचे आगमन ; आजही ठिकठिकाणी जपली जातेय ओवसा प्रथा*

*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*

आज तालुक्यात ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किवा ११ खडे आणून एकदिवशीय गौरीचे विधिवत आवाहन तसेच पूजन करण्यात आले. त्यानंतर ओवासण्याचा कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाले.
माहेरवाशिण म्हणून असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या बसविल्या जातात. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनूसार पाणवठ्यावर जाऊन पाच सात किवा ११ खडे आणून त्याची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ आदींपैकी एक दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवून त्यांची पूजा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गौराईचा सण उत्साहात साजरा कारण्यात आला. प्रत्येकाच्या परंपरेनुसार तीन, दोन किवा एक दिवसांसाठी हा गौराईचा सण साजरा करण्यात येतो. काही ठिकाणी आज मंगळवारी सकाळी एकेदिवशीय गौराई आणण्यात आल्या. यानंतर महिलांनी ठिकठिकाणी आपापल्या परंपरेनुसार होवसा भरण्याची प्रथा संपन्न झाली. महिलांनी पारंपरिक साड्या परिधान करून गौरी गणपती कडे होवसे भरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!