*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिजीत आचरेकर यांचा माफीनामा*
*आक्षेपार्ह पोस्ट केल्याने भाजपा सरचिटणीस महेश गुरव आक्रमक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील अभिजीत आचरेकर यांनी आपल्या फेसबुकच्या अकाऊंटवर मराठा समाजाबबाबत एक पोस्ट करत पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट सोमवारी केली होती. त्यासंदर्भात भाजपा सरचिटणीस, आशिये सरपंच महेश गुरव व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जाब विचारला.
मंगळवारी सकाळी माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात बोलवण्यात आले.
दरम्यान यावेळी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत अभिजीत आचरेकर यांनी जाहिरपणे माफीनामा दिला आहे.
कणकवली येथील भाजपा कार्यालयात अभिजीत आचरेकर याना मंत्री नाम. नितेश राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट का टाकली ? अशी विचारणा भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री, बंड्या मांजरेकर, बंड्या नारकर, भाजपा उपाध्यक्ष सोनु सावंत, सरचिटणीस महेश गुरव, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, कळसुली सरपंच सचिन पारधिये, स्वप्निल चिंदरकर, पिसेकामते सुहास राणे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
अभिजीत आचरेकर यांनी निरुत्तर होत मंत्री नाम. नितेश राणे यांची माफी मागितली. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याबद्दल फेसबुकच्या माध्यमातून माझ्या अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यांची मी माफी मागतो. अशा पध्दतीने या पुढे पोस्ट किंवा वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. या पोस्टबद्दल भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने दुखावली असतील, तर त्यांचीही माफी मागतो. यापुढे अशा प्रकारची माझ्याकडून चुक होणार नसल्याची कबुली अभिजीत आचरेकर यांनी दिली आहे.