*कोंकण एक्सप्रेस*
*जांभवडे बामणवाडी येथील सावंत परिवाराचा अनोखा उपक्रम*
*आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधला गणेशघाट*
जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अरुण शांताराम सावंत यांनी आपल्या परिवाराच्या वतीने आपले दिवंगत वडील कै.शांताराम सावंत यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने आपल्या स्वमालकीच्या जमिनीत गणेशघाट बांधून देऊन गेल्या अनेक वर्षांपासून असलेली गणेश घाटाची समस्या सोडवून दातृत्व काय असते हे दाखवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.सरकारी निधीतून गणेश घाटाची बांधणी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच साव़ंत परिवारातील श्री.अरुण सावंत,त्यांचे बंधू श्री विलास सावंत, श्री.राजेंद्र सावंत भगिनी सौ.अलका(सौ.विनया वामन तर्फे)यांनी स्वखर्चाने आपल्या स्वमालकीच्या जमिनीत वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या स्मरणार्थ गणेशघाट बांधून देण्याचे ठरविले.त्यांच्या या सामाजिक दायित्वा बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.श्री.अरुण सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दिर्घकाळ उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्य करुन सेवानिवृत्ती नंतर आपल्या जांभवडे येथील मुळ गावी स्थायिक झाल्यावर जांभवडे गावात सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे.विविध मार्गानी ते शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , धार्मिक कार्यात सहभागी होत असताना जांभवडे बामण वाडीच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.श्री.सावंत कुटुंबियांच्या स्वमालकिच्या जमिनीत स्वखर्चाने गणेशघाट बांधून देण्याच्या अनोखी उपक्रमाचा जिल्हावासियांनी आदर्श घ्यावा.त्यांच्या या दातृत्वा बद्दल जांभवडे बामणवाडी येथील नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले.