*कोकण Express*
*अवैध सिलिका वाळू वाहतुकीवर महसुलची कारवाई…*
*११ वाहनंं ताब्यात : कासार्डे परिसरात कारवाई….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत तब्बल ११ वाहन ताब्यात घेण्यात आली आहेत.
कणकवली कासार्डे येथील अवैध सिलिका वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेत ती कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. कणकवली तहसीलदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई कासार्डे येथे आज सकाळी करण्यात आली आहे. या कारवाई सकाळी सिलिका वाळू वाहतूक करणारे ९ ट्रक १ डंपर १ आयशर ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई तहसीलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी किरण गावडे, मंडळ अधिकारी मंगेश यादव, कोतवाल समीर राणे, दीपक आरेकर यांनी ही मोठी कारवाई केलीय.
