*कोंकण एक्सप्रेस*
*एम के सी एल रौप्य महोत्सवी कार्यक्रम कट्टा येथे उत्साहात साजरा*
*मालवण ः प्रतिनिधी*
गेली १७वर्षापासून ग्रामीण भागातून डिजिटल तंत्रज्ञानाचा चा पाया रोवून परिसरातील युवक युवती प्रशिक्षणार्थी तसेच डिजीटल साक्षर करून जनजागृती करणारी एक नामांकित संस्था म्हणून ओळख असणारी स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन कट्टा या ठिकाणी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) च्या पंचविसाव्या वर्धापन महोत्सव दिनानिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या विशेष प्रसंगी एमकेसीएलच्या वर्धापन दिनाचा ऑनलाईन वेबकास्ट दाखवण्यात आला. वेबकास्टद्वारे संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना मिळाली. तसेच कम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. श्रद्धा सुनील नाईक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एमकेसीएल सोबत 17 वर्ष सातत्याने बेस्ट परफॉर्मन्स मध्ये राहून एमकेसीएलचा ब्रँड समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम स्मिता कम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात आले असून सन २००१ ते २०२५पर्यंत चा देशातील तसेच राज्याचा एम के सी एल च्या कार्याचा आढावा घेताना संचालिका श्रध्दा सुनील नाईक यांनी माहिती देताना असे म्हटले की आज तागायत तब्बल दीड कोटी पेक्षा अधिक विद्यार्थी,युवक,महिला,कर्मचारी,अधिकारी, सेवानिवृत कर्मचारी, आजी आजोबा व बालके यांच्यापर्यंत एम एस सी आय टी हा संगणक कोर्स पोहोचला असून महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञानाचा पाया ठरला आहे.भारतातील सर्व राज्यात हे कार्य सुरू असून परदेशात ही वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.आजचे यश हे डॉक्टर विजय भटकर,श्री.विवेक सावंत,ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर व त्यांना साथ देणाऱ्या असंख्य अभियंत्यांना जात असून त्यांच्या या प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर एम के सी एल ने नाव मिळवले असून याचे फलित म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.आज दोनशे पन्नास हून अधिक अभ्यासक्रम ,एन ए पी २०२० अनुरूप क्रेडिटाईज अभ्यासक्रम उपलब्ध असून एम के सी एल ची वाटचाल ही यशस्वीपणे चालू आहे. अश्या संगणकीय डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून सामजिक बांधिलकी म्हणून केलेले कार्य हे पुण्यदानाचे असून डिजिटल साक्षर करण्याची संधी आपल्याला मिळाली याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले
स्मिता कॉम्प्युटर संस्थेतून
डिजिटल साक्षर झालेल्या युवक,युवती,ग्रामस्थ,शिक्षक,शिक्षिका,अधिकारी,कर्मचारी,यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडताना “माउस” पकडण्यापासून ते एमएससी आयटी चा प्रवास कसा संघर्ष व प्रेरणादायी होता याबद्दल अनुभवकथन करताना सामजिक बांधिलकी जपत चाललेल्या कार्याबद्दल प्रशासो दगार काढले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने MS CIT प्रमाणपत्राचे वितरणवरची गुरामवाडी ग्रामपंचायत सरपंच माननीय शेखर पेणकर, वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ..देवयानी धनंजय गावडे , सौ. पाडावे मॅडम,श्रीमती अनुष्का गुराम,ज्येष्ठ शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली सजावट संगीतमय सुमधुर वातावरण रोषणाई ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
शिक्षक, निवृत्त शिक्षक, शिक्षिका,प्राध्यापक, पत्रकार , प्राथमिक शिक्षिका,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, महिला मंडळ भगिनी, विद्यार्थी व पालक वर्ग, ज्येष्ठ नागरिक उत्स
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पंचवीस मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या संचालिका सौ नाईक मॅडम यांच्या हस्ते आदरयुक्त सत्कार करण्यात आला.
कम्प्युटर एज्युकेशन सेंटरने यापूर्वीही अनेक उपक्रमडिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक उपक्रम राबवले असून, यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करून संगणकाचा प्रसार करण्याचा मनोदय संचालिका सौ.श्रध्दा सुनील नाईक यांनी व्यक्त केला.
या महोत्सवी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व युवक,युवती मध्ये पालकवर्गामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रेरणा निर्माण झाली. उपस्थित मान्यवरांनी एमकेसीएलच्या उपक्रमांचे कौतुक करून थेट कार्यक्रम पाहण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल स्मिता कम्प्युटरचे आभार मानले.
या निमित्ताने माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. सीमा पडते मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सौ. दीपिका वेंगुरलेकर मॅडम, निवृत्त शिक्षक श्री धूत्रे गुरुजी, सौ. अर्चना धुत्रे मॅडम, CRP सौ स्वप्नाली तळगावकर मॅडम, अंगणवाडी सेविका चैताली डीचवलकर, कु.सोनाली वाईरकर मॅडम, आशा श्रीमती पाडावे मॅडम, श्रीमती गुराम मॅडम…सौ. प्रभूलकर coching classes च्या सौ लता प्रभूलकर मॅडम हितचिंतक उपस्थित होते.