खवळे महागणपतीचा त्रिशताब्दी रौप्य महोत्सव दिमाखात साजरा होणार*

खवळे महागणपतीचा त्रिशताब्दी रौप्य महोत्सव दिमाखात साजरा होणार*

*कोंकण एक्सप्रेस*

*खवळे महागणपतीचा त्रिशताब्दी रौप्य महोत्सव दिमाखात साजरा होणार*

*देवगड : प्रशांत वाडेकर*

नवसाला पावणारा, हाकेला धावणारा व लिम्का बुक मध्ये नोंद असलेला तारामुंबरी (ता. देवगड) येथील प्रसिद्ध श्री खवळे महागणपती यंदा ३२५ वे त्रिशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या जल्लोषात साजरे करणार आहे. तब्बल २१ दिवस चालणाऱ्या या महाआराधनेत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची पर्वणीच भक्तांना लाभणार आहे, अशी माहिती खवळे महागणपती उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी महोत्सवाचा शुभारंभ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने होणार असून, यावेळी सोहळ्याचे उद्घाटन करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह स्वामी यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री ना. डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा समावेश आहे. तसेच या गणेशोत्सव कालावधीत देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्र मर्यादित गणपती सजावट स्पर्धा घेण्यात येणार असून यासाठी प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांनी चिन्मय खवळे ९३७१०१४१७४ यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती खवळे महागणपती उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे यांनी देवगड येथील डायमंड हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री. अक्षय खवळे (सेक्रेटरी), श्री. अण्णा खवळे उर्फ तुकाराम खवळे, श्री. विकट खवळे (प्रसिद्धिप्रमुख), श्री. दिनेश खवळे, श्री. सचिन खवळे, श्री. राजू खवळे, तसेच चिन्मय खवळे उपस्थित होते.
या महोत्सवी वर्षात आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा ०२ व ०३ सप्टेंबर रोजी पुणे संस्थेचे विज्ञान प्रदर्शन,०४ सप्टेंबर रोजी प्राथमिक शाळांसाठी तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा
पहिली ते चौथी पहिला गट वेट सकाळी दहा ते अकरा पाचवी ते दहावी दुसरा गट वेळ सकाळी ११ ते १२ (विषय खवळे महागणपती रेखाटन). पहिला गट पारितोषिक प्रथम क्रमांक रुपये १००० द्वितीय क्रमांक रुपये ७०० तृतीय क्रमांक रुपये ५०० तसेच दुसरा गट प्रथम पारितोषिक १००० द्वितीय पारितोषिक ७०० तृतीय पदासाठी ५०० तसेच प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हे दिले जाणार आहेत.०५ सप्टेंबर तारामुंबरी गाव मर्यादित चित्रकला स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक १०००/- द्वितीय ७०० /- तृतीय ५०० /- प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
०७ सप्टेंबर महारक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर , शिबिरात सहभागींना सन्मानपत्र देण्यात येणार आहे . सायंकाळी ५ ते ७ डॉ निशा धुरी गोवा यांचा अभंग भावगीत, भक्तीगीत सुश्राव्य गायनाची बहारदार मैफलीचे सादरीकरण होणार आहे.
०८ ते १२ सप्टेंबर असे चार दिवस राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २१ हजार द्वितीय क्रमांक १५ हजार, तृतीय क्रमांक ७ हजार तर उत्तेजनार्थ दोन मंडळाना रुपये ३ हजार व प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह तसेच विजेता संघ वगळून राज्यस्तरीय भजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत या स्पर्धेत एकूण १६ भजन मंडळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. भजन स्पर्धेच्या सहभागासाठी दिनेश खवळे ९४२२६३२९१९ सचिन खवळे ९४२३३०३५९१ यांच्याशी संपर्क साधावा . १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत चौक स्वाती दामले यांचे कीर्तन तर सायंकाळी साडेसहा वाजता श्री रमेश गोंधळी आणि सहकारी यांचे यांची शुभम संगीतमय पल तसेच ११ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता जादूचे प्रयोग , जादूगार अवधूत यांच्या सुपरहिट लॉजिक , १२ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पालकमंत्री यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
१३ सप्टेंबर रोजी जगदगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह स्वामींची महागणपती दर्शनासाठी उपस्थिती असणार आहे.दुपारी ३ ते ६ वाजता तारामुंबरी गाव मर्यादित होम मिनिस्टर स्पर्धा,
१४ सप्टेंबर रोजी योगेश सामंत मालवण कुंभारमाट यांचे सुश्राव्य भजन कार्यक्रम होणार आहे.तर १५ सप्टेंबर रोजी पारंपरिक वार्षिक लळीत (जागर), तसेच परिवारातील कार्यकर्त्यांचा सन्मान व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. (१५ सप्टेंबर या दिवशी खवळे कुटुंबीयांचा वार्षिक कार्यक्रम असल्यामुळे बाहेरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले नाही)तर १६ सप्टेंबर रोजी ढोलताशांच्या गजरात शिवकालीन मर्दानी खेळ तसेच दिर्बा रामेश्वर जामसुंडे गोविंदा पथकांची श्रींना सलामी देत महागणपती विसर्जन करण्यात येणार आहे. आदि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खवळे महागणपती उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!