*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान भोगले यांची फेरनिवड*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी माजी सरपंच सत्यवान सूर्यकांत भोगले यांची सर्वानुमते पुन्हा एकदा फेरनिवड कारण्यात आली.
माजी सरपंच सत्यवान भोगले यांनी आपल्या कारकिर्दीत गावातील अनेक तंटे आपल्या कौशल्याने सोडविले. गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिल्यामुळे संपूर्ण गावाने त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष पदी राहण्याची विनंती केली. ग्रामस्थांच्या आग्रहापोटी त्यांनी अध्यक्ष पद स्वीकारले.
गावची ग्रामसभा नुकतीच सरपंच महेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तंटामुक्ती समितीची कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी गावच्या विविध विकासकामावर चर्चा झाली. चाफेड भोगलेवाडी प्रशालेत उप मतदान केंद्र व्हावे, उप आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय उप केंद्र, आठवड्यातून एक दिवस तलाठी सेवा आदी विकास कामांची मागणी करण्यात येऊन तसे ठराव घेण्यात आले.
यावेळी सरपंच महेश राणे, नूतन तंटामुक्ती समिती अध्यक्ष सत्यवान भोगले, ग्रा. पं. सदस्य सुनील कांडर, सुदर्शन उर्फ नागेश साळकर, सौं सान्वी मेस्त्री, सौं प्रतिभा मेस्त्री, सौं. मानशी परब, सौं. राधिका ठुकरुल, ग्रामविस्तार अधिकारी एच. बी. तेरसे, माजी सरपंच सौं. संचिता भोगले, संतोष साळसकर, आशा स्वयं सेविका सौं. प्रणिता राणे, सी आर पी सौं. समिधा घाडी आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील तंटामुक्ती संदर्भात आलेल्या तक्रारीचे नूतन अध्यक्ष सत्यवान भोगले यांनी निरसन केले.