*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेडच्या माजी ग्रा. पं. सदस्या सुनीता राणे यांचे निधन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण ( राणेवाडी ) येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती सुनीता दत्तात्रय राणे ( 76 ) यांचे शनी दि. 23 ऑगस्ट रोजी दु. 3 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना, एक भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबातील नातवंडा मध्ये त्या ” बेबी आई” म्हणून परिचित होत्या. माजी सरपंच आकाश राणे यांच्या त्या मातोश्री तर आशा स्वयंसेविका सौं. प्रणिता राणे यांच्या सासू होत. त्यांच्या अंत्ययात्रेला भाजपा चे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंगेश लोके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेड सरपंच महेश राणे,निरोमचे सरपंच राजू राऊत, साळशीचे माजी सरपंच किशोर साळसकर आदी उपस्तित होते.