*कोंकण एक्सप्रेस*
*जळकेवाडी नाथ पे नगर ते गणपती साना रस्ता मा.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्व:खर्चातून दिला करून*
*जळकेवाडी रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे मानले आभार*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली शहरातील नाथ पै नगर ते गणपती साना रस्ता खड्डे माय व नादुरुस्त होता. जळकेवाडी येथील रहिवासी गणपती विसर्जन नाथ पै नगर येथील गणपती साना येथे करतात. पण हा रस्ता खड्डे असल्यामुळे विसर्जनांच्या वेळी विघ्न येणार म्हणून त्यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना रस्ता दुरुस्तीचे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत नलावडे यांनी स्वखर्चाने गणपती साना रस्त्याची दुरुस्ती करून दिली आणि रस्ता खड्डेमुक्त करून दिला याबद्दल नाथ पै नगर आणि जळकेवाडी येथील रहिवाशांनी समीर नलावडे यांचे मानले आभार.