*कोंकण एक्सप्रेस*
*प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसांत काढावेत*
*सिंधुदुर्गनगरी दि. २२ (जिमाका) :-*
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध प्रकारचे (राजकीय, सामाजिक, वैयक्तिक शुभेच्छा) इ. प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. विनापरवानगी लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. सदरची सूचना प्रसिध्द झाल्यापासून आठ दिवसांत काढून टाकण्यातबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील अद्याप काही फलक दिसून येत आहेत. फलक तातडीने हटविण्याबाबतच्या अध्यक्ष सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.
आठ दिवसात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड इ. जाहिराती संबंधितांकडून न काढल्यास कोणत्याही प्रकारची सूचना न देता होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक, बोर्ड या कार्यालयाकडून काढून टाकण्यात येतील व त्यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार आपणाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच भविष्यात प्राधिकरण क्षेत्रात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक बोर्ड इ. लावायचे झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.