*कोंकण एक्सप्रेस*
*माजी सैनिकांच्या पाल्यास परदेश शिक्षणाकरीता आर्थिक मदत*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :-*
माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत रा. सबनिसवाडा ता. सावंतवाडी यांचे पाल्य स्वप्निल संतोष सावंत हा रशिया येथे MBBS चे शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी माजी सैनिक संतोष सांवत यांना त्यांच्या पाल्याच्या परदेश शिक्षणाकरीता सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने कल्याणकारी निधीतून 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते अदा करण्यात आला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहा. सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मार्फत वेळोवेळी निर्धारित केलेल्या विविध योजनांतून जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये, अवलंबित यांच्याकरीता कल्याणकारी निधीतून शैक्षणिक व पुनर्वसनाच्य विविध प्रकारच्या आर्थिक मदत दिल्या जाते.
जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक त्यांची अनाथ पाल्ये, अवलंबित यांनी अश्या प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा (उदा. शैक्षणिक, स्वयंरोजगार, पुनर्वसन) लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.