_अन्न नागरी पुरवठा विभागाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न_

_अन्न नागरी पुरवठा विभागाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न_

*कोंकण एक्सप्रेस*

*_अन्न नागरी पुरवठा विभागाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न_*

*रास्त भाव दुकानदार हे शासन व जनतेतील महत्वाचा दुवा*

*- जिल्हाधिकारी अनिल पाटील*

*सिंधुदुर्गनगरी दि 18(जिमाका)*

शासनाच्यावतीने देण्यात येणारे धान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाचविण्याचे काम रास्त भाव दुकानदार प्रामाणिकपणे पार पाडतात. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता सेवा देणाऱ्या या दुकानदारांच्या कार्यामुळे गरीब व गरजूंना मोठा दिलासा मिळतो. रास्त भाव दुकानदार हे शासन व जनतेतील महत्वाचा दुवा म्हणून काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
महसूल सप्ताहाचा सुवर्ण मध्य व औचित्य साधून अधिकारी, कर्मचारी तसेच रास्त भाव दुकानदारांच्या उल्लेखनीय व प्रामाणिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासन व अन्न नागरी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हा नियोजन सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेपर्यंत वेळेवर व पारदर्शक पध्दतीने धान्य वितरण करुन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या दुकानदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच सद्भावना दिनानिमित्त उपस्थितांना शपथ देखील देण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समीतीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, श्रीमती आरती देसाई तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहासिलदार, रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, रास्त्‍ भाव दुकानदारांना गरीब आणि गरजू व्यक्तींची सेवा करण्याची संधी मिळाली असून आपण सर्वंजण प्रामाणिकपणे काम करुन त्यांचे आशीर्वांद मिळवत आहात. तुमचा गांवकऱ्यांशी चांगला संपर्क असल्याने शासनातर्फे विविध योजना राबविताना रास्त भाव दुकानदारांना त्यात महत्वाची जबाबदारी नक्कीच देण्यात येते. आपल्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी 3 महिन्यांचे धान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट्य शासनाने दिले होते. हे उद्दिष्ट्य तुमच्या सहकार्यामुळे आपण पूर्ण करु शकलो असेही ते म्हणाले.
अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे म्हणाल्या की, अन्नधान्य गरजुपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे कार्य रास्त भाव दुकानदार करत असतात. आज तुम्ही केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव होत आहे. तुम्ही यापुढेही प्रशासनाला असेच सहकार्य करण्याचे आवाहन श्रीमती साठे यांनी यावेळी केले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री दळवी म्हणाले, शासनाकडून प्राप्त धान्य पात्र लाभार्थ्यांपर्यंत वितरीत करणे हे महत्वाचे काम आहे. कोविड कालावधीत रास्त भाव दुकानदारांने केलेले काम कौतुकास्पद होते. पुरवठा विभागाने वितरण प्रणाली मध्ये वेळोवेळी जे बदल केले ते बदल स्विकारण्यामध्ये आपला जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे असेही ते म्हणाले.
श्री सावंत म्हणाले की, प्रशासन आणि रास्त भाव दुकानदार हे विकासाच्या रथाचे दोन चाके आहेत. नेहमीप्रमाणे दोघांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना तुम्ही अन्न धान्याचा पुरवठा करता हे खूप मोठे कार्य असल्याचेही ते म्हणाले.
श्रीमती देसाई म्हणाल्या की, अन्नाची गरज पूर्ण व्हावी या उद्देशाने पुरवठा विभाग काम करत आहे. हा उद्देश पूर्ण करण्यात रास्त भाव दुकानदारांची भूमिका खूप महत्वाची आहे. तुमच्या माध्यमातून अन्न धान्य तळागाळापर्यंत पोहचते असेही त्या म्हणाल्या.
*पुरस्कार पात्र रास्त भाव धान्य दुकानदार-*
*दोडामार्ग :-* समाधान महिला बचत गट कुडासे झरे वसाहत, चेअरमन विविध सेवा सोसायटी कळणे, अध्यक्ष सखी स्वय: सहायता महिला समूह झरेबांबर, अध्यक्ष चेतना स्वय: सहायता महिला समूह झोळंबे, चेअरमन माजी सैनिक संघटना मणेरी, सरपंच ग्रामपंचायत खोक्रल, श्री सातेरी माऊली बचतगट शिरंगे व चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आयी माटणे, श्री. संतोष वैजू मोरे पुरवठा निरीक्षक व श्रीम. उत्कर्षा उल्हासकुमार ठाकुर पुरवठा लिपिक
*वेंगुर्ला :-* आरवली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.आरवली नं 2, मोचेमाड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मोचेमाड, वेंगुर्ला तालुका स. खरेदी विक्री संघ लि. मातोंड, ग्रामपंचायत धान्य दुकान पालकरवाडी, श्री सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या. खानोली, श्रीम. तृप्ती काशिराम गडकर निरीक्षण अधिकारी, गणेश रामा पाटील गोदाम व्यवस्थापक, विशाल बाळासाहेब नार्वेकर गोदाम पालक व श्री.विजय फकिरा पवार निरीक्षण अधिकारी
*सावंतवाडी :-* नेमळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. नेमळे, कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. कोलगाव, भावई क्षेत्रपाल वि. स. संस्था कुणकेरी, मनोहर दत्ताराम नाईक, लक्ष्मी राघो परब, श्री स्वयंभु सहकारी व्यवस्थापक संस्था. म. आंबोली, गणराया स्वय: सहायता महिला बचत गट बावळाट, श्री. अमोल पुंडलिक बीडये गोदाम पालक, श्री. धोंडी विठ्ठल मेस्त्री गोदाम व्यवस्थापक, श्री. कमलेश पांडुरंग ठाकुर पुरवठा निरीक्षक व श्रीम. दिपाली सचितानंद गोटे निरीक्षण अधिकारी
*देवगड* :- रोहेश चंद्र्कांत काणेरकर (देवगड 2), मोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. पेंढारी, सरपंच ग्रामपंचायत वळीवंडे, तोरसोळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि, सरपंच ग्रामपंचायत विजयदुर्ग, विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी बापर्डे, चेअरमन शिरगाव नवजीवन विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आंबेखोल, भुमी स्वय: सहायता अपंग बचत गट साळशी, सुजाता दिगंबर गावकर (देवगड 1), श्री. संदिप मेस्त्री, महसूल सहा., श्री. सुनील पांडुरंग बेबले पुरवठा निरीक्षक, इब्राहीम रमजान तडवी गोदाम व्यवस्थापक, महादेव सखाराम बंगारे गोदाम व्यवस्थापक विजयदुर्ग व श्री.संग्राम ज्ञानोबा गुट्टे पुरवठा निरीक्षण अधिकारी
*कणकवली* :- लिकिता लवु वारंग, पावणाई स्वय: सहायता महिला बचत गट साकेडी, श्री गणेश स्वय सहायता महिला समूह बचत गट फणसनगर, श्रीम.कालिंदी कांबळे, महसूल सहा., श्रीम. रती चंद्र्कांत घोडके पुरवठा निरीक्षक, श्री. जगदीप जगन्नाथ चाळके गोदाम व्यवस्थापक, श्री. नितीन शंकरराव डाके गोदाम व्यवस्थापक, प्रशांत भिकाजी पवार, अगबर गुलाब नाचरे, श्री. रामेश्वर दौलत दांडगे पुरवठा निरीक्षक, श्रीम.सिमा हिम्मतराव गायकवाड निरीक्षण अधिकारी,
*देवगड* :- सरपंच ग्रामपंचायत नेरूर तर्फ हवेली, प्रगती स्वय: सहायता महिला बचत गट गावराई, चेअरमन नेरूर ग्राम सहकारी संस्था लि., चेअरमन पब्लिक कमिटी बिबवणे, गणराया स्वय: सहायता महिला बचत गट बावळाट, श्रीम. शिरीष सतीश माने पुरवठा निरीक्षक, श्रीम. शिवानी सर्जेराव पाटील पुरवठा निरीक्षक व श्रीम.सुजाता भरत जाधव गोदाम व्यवस्थापक
*मालवण* : कुलस्वामिनी स्वय: सहायता महिला बचत गट मेढा मालवण, श्री. सातेरी महिला बचत गट मेढा, मालवण तालुका खरेदी विक्री संघ मालवण, श्री. विशाल अरुण कापसे पुरवठा निरीक्षक, श्री. दिनेश श्रीकांत सावंत गोदाम व्यवस्थापक, श्रीम. शिला विश्वास निकस निरीक्षण अधिकारी, श्री. वीरसिंग वसावे, तहसीलदार कुडाळ, श्रीम. वर्षा झालटे, तहसीलदार मालवण व श्रीम. ऐश्वर्या काळुशे, उपविभागीय अधिकारी, कुडाळ
*विशेष पुरस्कार :-* तीन महिन्यांची धान्य उचल मुदतीपूर्वी पूर्ण करुन उचलीमध्ये संपूर्ण राज्यात सिंधुदुर्गचा क्रमांक प्रथम राखण्यात सिंहाचा वाटा उचलला.
श्री.एच.पी.घुमरे – वाहतुक कंत्राटदार, श्री.समिर परब – श्रमसिंधु हमाल कामगार संघटना हमाल कंत्राटदार व श्री. मकरंद देसाई – जन सुराज्य हमाल कामगार संघटना कंत्राटदा
तीन महिन्यांची धान्य उचल व वितरण करताना इतर धान्य दुकानदारांना प्रोत्साहित केले. त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून या ठिकाणी त्यांचाही गौरव होणे आवश्यक आहे
श्री.रुपेश दिगंबर पेडणेकर, अध्यक्ष धान्य दु. संघटना व श्री. कान्होबा लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष , धा.दु.संघटना
*ओयासीस कर्मचारी व अधिकारी यांची नावे*
श्री. प्रशांत गावडे, तालुका मालवण, श्री. ओंकार सुतार, तालुका वैभववाडी, श्री. गजानान राऊळ, तालुका सावंतवाडी, श्री. विवेक चिंदरकर, तालुका देवगड, श्री.सचिन मराठे, तालुका कुडाळ व श्री. योगेश केरकर जिल्हा व्यवस्थापक

*१०० दिवस कार्यालयीन सुधारणा: उल्‍लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान*
राज्‍यात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबविण्‍यात आली. सदर मोहिमेअंतर्गत कार्यालयीन विशेष व उल्‍लेखनीय कामगिरी करुन सदर मोहिमेत क्रमांक पटकावलेला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
1. जगदीश कातकर ,उपविभागीय अधिकारी, कणकवली
2. दिक्षांत देशपांडे, तहसिलदार, कणकवली
3. श्री बी.डी. नार्वेकर, उपविभागीय कृषी अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!