*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले न.प. निवडणुकिसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर : १० प्रभाग आणि असणार २० नगरसेवक*
*हरकीत व सूचनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत :मुख्याधि
*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुक २०२५ साठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०११ ची जनगनना विचारात घेऊन वेंगुर्ले शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग निश्चीत करण्यात आले असून २० नगरसेवक संख्या असणार आहे.
१७ नगरसेवक असलेल्या वेंगुर्ले नगरपरिषद मध्ये २० नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी २१ जण असणार आहेत. प्रभाग रचना निश्चीत झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
दरम्यान प्रभाग रचना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदरच्या हरकती व सूचना नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. पालिकेची प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे यापुढे सर्वांचे लक्ष प्रभागांतील आरक्षणाकडे लागून राहणार आहे. नगराध्यक्ष जनतेतूनच निवडले जाणार असे सध्या तरी स्पष्ट आहे. मात्र नगरसेवक पदासाठी आरक्षणाची प्रतिक्षा सर्वाना लागली आहे.