*कोकण Express*
*सिंधुदुर्ग बँकेसह, विकास संस्थांच्या निवडणूका पुन्हा सहा महिने पुढे ढकलल्या…*
*सिंधुदुर्ग दि.6*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका आणखी सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने परिपत्रक काढले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका सातव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यत निवडणुका पुढे गेल्याने विद्यमान पदाधिकारी व संचालक मंडळाना अधिकची मुदत वाढ मिळत आहे.