*कोंकण एक्सप्रेस*
*चीपी विमानतळावरून चतुर्थीच्या काळात विमानसेवा पुर्ववत होणार : मंत्री नितेश राणे*
*”व्हीजीएफ” योजनेअंतर्गत मंत्रिमंडळाची मान्यता…*
*मुंबई*
चिपी विमानतळावरून लवकरच विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गणेश चतुर्थीच्या काळात ही सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे दिली.
यावेळी ते म्हणाले, हे विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा केला आणि व्हीजीएफ स्कीमचे अंतर या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावे, कायमस्वरूपी सुरू करावे या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता हे खासदार नारायण राणे यांनी आणली. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला आहे. आता चीपी विमानतळाच्या मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे. संबंधित स्कीम मधून काही सवलती आम्हाला चीपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे. लवकरच आमचा चिपी विमानतळ कायमस्वरूपी लोकांसाठी, आमच्या कोकणवासियांसाठी, पर्यटकांसाठी, चाकरमान्यांसाठी सुरू होणार आहे. यासाठी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पूर्ण राज्य मंत्रिमंडळाचा आभार मानतो.