कल्पकतेने फोटो काढणे हीच खरी फोटोग्राफी

कल्पकतेने फोटो काढणे हीच खरी फोटोग्राफी

*कोंकण एक्सप्रेस*

*कल्पकतेने फोटो काढणे हीच खरी फोटोग्राफी*

*भगवान लोके यांचे प्रतिपादन : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवलीत छायाचित्रांचे प्रदर्शन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

फ्रेंच तंत्रज्ञानातून19 ऑगस्ट 1839 रोजी फोटोग्राफी ही जगासमोर आली. आता फोटोग्राफीच्या क्षेत्रात आता आधुनिकता आली आहे. कल्पकतेने फोटो टिपणे हे खरी फोटोग्राफी आहे. सिंधुदुर्गातील फोटोग्राफरांनी कल्पकतेने जिल्ह्यातील पर्यटनास्थळे अन्य स्थळांची फोटो काढून ती जगासमोर आणली आहेत. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा आपलं कोकण थीमवर मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. वृत्तपत्रांसाठी लागणारे फोटो मिळवून देण्यासाठी फोटोग्राफर जोखीम पत्करून काम करीत आहेत. फोटोशिवाय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी बातमी अपूर्ण असते. पत्रकार व फोटो ग्राफर, संपादकीय मंडळींमुळे वृत्तपत्रांमध्ये परिपूर्ण बातमी प्रसिद्ध होते, असे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले.

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशन व रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात मोबाईल फोटोग्राफरांनी काढलेल्या फोटोचे प्रदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. लोके बोलत होते. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब वळंजू, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, रोटरी क्लबच्या सचिव सुप्रिया नलावडे, ज्येष्ठ रगंकर्मी वामन पंडित, इंद्रजित तांबे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पारधिये, संतोष कांबळे आदींसह रोटरी मेंबर्स व तालुक्यातील फोटोग्राफर्स उपस्थित होते.

रोटरी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र रावराणे म्हणाले, मोबाईलमध्ये फोटो व सेल्फी काढणे हे गौण आहे. मात्र, कल्पकतेने फोटो काढणे ही फोटोग्राफरची खरी कला आहे. सिंधुदुर्गातील फोटोग्राफर हे कल्पनेतेन फोटो काढतात. फोटोग्राफी क्षेत्रात आधुनिकता आली आहे. ही आधुनिकता जिल्हयातील फोटोग्राफारांनी आत्मसात केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह अन्य स्थळांचे फोटो फोटोग्राफरांनी काढून त्यांचे डॉक्युमेशन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विजय वळंजू म्हणाले, फोटोग्राफी ही एक कला आहे. ही कला आत्मसात करणे सोपे नाही. सिंधुदुर्ग जिल्हयातील युवक , युवतींना फोटोग्राफी शिक्षणाची आवड आहे. त्यासाठी कणकवली महाविद्यालय व फोटोग्राफर संघटनेतर्फे फोटोग्राफीचे शिक्षण देण्याचे आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या युगात प्रत्येकाने व्यवासयिक बाणा आत्मसात केला पाहिजे. त्यामुळे घरोघरी रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गाच्या नाव लौकिकात जिल्ह्यातील फोटोग्राफरांचे मोलाचे योगदान आहे. सिंधुदुर्गातील फोटोग्राफरांनी कातळशिल्पांचे फोटो काढून त्याचे डॉक्युमेशन करून प्रदर्शन भरवावे, अशी अपेक्षा वामन पंडित यांनी व्यक्त केली. तर युवराज महालिंगे यांनी मन आणि चित्त एकाग्र करण्यासाठी प्रत्येकाने फोटोग्राफी ही कला आत्मसात केली पाहिजे. सुप्रिया नलावडे यांनी कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनला जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील फोटोग्राफरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भरणा-या फोटोच्या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन इंद्रजित तांबे यांनी केले.
प्रास्ताविक करताना विनायक पारधिये म्हणाले, फोटोग्राफरअसोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आपलं कोकण मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत अनेकांना सहभागी होता आले. यापुढील काळात असोसिएसनतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. आरंभी फोटोग्राफर असोसिएशनने भरविलेल्या मोबाईल फोटोग्राफी फोटोच्या प्रदर्शनाचे अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. फोटोग्राफर असोसिएशनतर्फे दिलीप काळसेकर, रमाकांत निमणकर, विलास गुडेकर या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. फोटोग्राफर असोसिएशनयाच्यावतीने अरुण काणेकर व नितीन उर्फ बाबू मुसळे यांना श्रद्धांजली वाहिली. मान्यवरांचे स्वागत विनायक पारधिये यांनी केले. सूत्रसंचालन सुरजित ढवण यांनी केले. आभार विनोद दळवी यांनी मानले.
या कार्यक्रमाला रोटरी कल्ब मेंबर माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, तृप्ती कांबळे, लिना काळसेकर, अ‍ॅड. गुरु पावसकर, महेंद्र मुरकर यांच्यासह फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश चव्हाण, सहसचिव कृष्णा कांबळी, खजिनदार विनोद दळवी, हेमंत काळसेकर, संजय राणे, नितीन कुवळेकर, संतोष सावंत, पप्पू निमणकर, मिलिंद निमणकर, चेतन पवार, संतोष सावंत, योगेश्वर मोडक, रविकिरण शिरवलकर, समर्थ कोळंबकर आदी उपस्थित होते.
चौकट
आपला कोकण मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत पूर्वा कुवळेकर प्रथम
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे आपलं कोकण मोबाईल फोटोग्राफी ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत विजेत्यांची नावे संतोष कांबळे यांनी जाहीर केली. यात पूर्वा कुवळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दत्ता मणचेकर द्वितीय, हर्षद तळवडेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अपूर्वा ठाकूर, निलेश परब यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. विजेत्यांना मान्यवरांच्या बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!