*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण शुकनदीने ओलांडली धोक्याची पातळी*
*सरपंच प्राची इस्वलकर यांचे ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज अखेर खारेपाटण येथील शुक्रनदी ने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खारेपाटण येथे पुरस्थीती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथील अनेक जोड रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले यामध्ये मच्छि मार्केट, कोंडवाडी रस्ता, जैनवाडी रस्ता, या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच बंदरवाडी कडे जाणारा घोडेपाथर येथे व खारेपाटण मुख्य बाजारपेठ रस्ता या रस्त्यावर अद्याप पाणी आलेले नाही परंतु जर पावसाचा जोर असाच राहिला तर या दोन मुख्य रस्त्यावरही पाणी येऊन रस्ता ब्लॉक होण्याची शक्यता आहे.सरपंच प्राची इस्वलकर यांनी खरेपाटण ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे तसेच प्रत्येकाने आपापली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच कोणतेही आपत्ती परिस्थिती ओढवत असेल तर त्वरित ग्रामपंचायत किंवा दक्षता समिती कडे संपर्क करण्याचे आवाहन देखील सरपंच प्राची इस्ववलकर यांनी केले आहे.