*कोंकण एक्सप्रेस*
*विशाल परब यांचे भाजप मधील निलंबन केले रद्द*
*भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल परब यांची भाजप मध्ये घरवापासी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील विशाल परब यांचे भाजप मधील निलंबन आज रद्द करण्यात आले आणि विशाल परब यांची भाजप मध्ये घरवापासी झाली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत परब यांना निलंबन मागे घेतल्याचे पक्षाचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी आमदार व भाजपचे महामंत्री विक्रांत पाटील, सिंधुदुर्गचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि आमदार विक्रम पाचपुते उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मला जोमाने काम करायची इच्छा आहे. अशी कित्येक वेळा विनंती विशाल परब यांनी केली होती. त्यामुळे विशाल परब यांनी केलेल्या या विनंतीवरून देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यापुढे विशाल परब आणी त्यांचे असंख्य कार्यकर्ते कोकणात जोमाने पक्ष वाढवण्यासाठी काम करतील. असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी विशाल परब यांच्या सोबत हजारो कार्यकर्त्याची पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी झाली आहे.यावेळी युवा कार्यकर्त्यांसह, महिला युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.