ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधीर धुरी यांची फेरनिवड

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधीर धुरी यांची फेरनिवड

*कोंकण एक्सप्रेस*

*ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधीर धुरी यांची फेरनिवड*

*मालवण : प्रतिनिधी*

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधीर धुरी यांची फेरनिवड. तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके, तन्वीर खतीब तर सचिवपदी अर्जुन परब यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्य निरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यावेळी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर उपस्थित होते.
नूतन सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी- मालवण, उपाध्यक्ष संजय शेळके- वैभववाडी, उपाध्यक्ष तन्वीर खतीब- बांदा सावंतवाडी, सचिव अर्जुन परब- मांळगाव मालवण, खजिनदार हनीफभाई पीरखान-कणकवली, महिला संघटक सौ.मिनल पार्टे- कट्टा नांदोस मालवण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय खानविलकर- तळेरे-कणकवली, महिला संघटक सौ.शिवानी पाटकर- सावंतवाडी शहर, जिल्हा जनसंपर्क अधिकारी डॉ. वैभव आईर- कुडाळ सिंधुदुर्ग नगरी, जिल्हा सल्लागारपदी प्रकाश तेंडोलकर- बांदा सावंतवाडी, कार्याध्यक्षपदी मंदार काणे- पडेल देवगड यांची निवड करण्यात आली आहे.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत आवाज उठवून अन्यायग्रस्तांना आज न्याय मिळवून देण्याचे कार्य गेली पाच वर्षे संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात केले गेले आहे. तसेच प्रयत्न यापुढे सुद्धा सुरू राहतील. त्याचप्रमाणे जिल्हा व सर्व तालुका संघटना पदाधिकारी व सदस्य यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये संघटनेचे सभासद वाढवून संघटना वाढीचा विस्तार व्यापक करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!