*कोंकण एक्सप्रेस*
*मडुरा रेखवाडी येथील दुकान अज्ञात चोरट्यानी रात्री फोडले*
*बांदा प्रतिनिधी*
रविवारी रात्री मडुरा रेखवाडी येथील श्री दत्ताराम कोरगावकर हे आपलं दुकान बंद करून रात्री घरी गेले असता सकाळी दुकान उघडायला गेले असता दुकान चे कुलुप फोडल्याचे कोरगावकरांच्या निदर्शनास आले दुकानातील कुलुप फोडून रुपये ७०००/ रोग रक्कम तसेच काही वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केले गावांमध्ये फिरणारे फेरीवाले हे वाढत असल्यामुळे असे प्रकार गावागावात घडत आहे त्यामुळे पोलिसांनी यांचा चोख बंदोबस्त करावा असे श्री दत्ताराम कोरगावकर यांनी म्हटलेले आहे अज्ञात चोरट्या विरोधात कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल केलेला नाही तरी पोलिसांनी या संदर्भात जे परप्रांतीय गणेश चतुर्थीच्या काळात आहे ना काही वस्तू घेऊन गावात फिरत आहेत त्यांच्यावर करडी नजर ठेवावी व रात्रीची गस्त घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे