*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी – रमण वाईरकर*
*मालवण : (प्रतिनिधी)*
चतुर्थी सणानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी, सिंधुदुर्गात कित्येक वर्षे तपासणी झालेली नाही. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समितीचे मालवण तालुकाध्यक्ष रमण वाईरकर यांनी सह. आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपतीसाठी गणेशभक्त आवडीने खवा-माव्याचे पदार्थ अर्पण करत असतात. ते पदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खवा/मावा येतो. तो फक्त महाराष्ट्रातूनच येतो, असे नाही तर, अन्य राज्यांतूनही येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खवा /मावा तयार करताना त्यामध्ये भेसळ नक्की होत असते. चतुर्थीत. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी, अशी मागणी रमण वाईरकर यांनी निवेदनात केली आहे.