साटेली – भेडशीत वावळेश्वर मंदिर येथे स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने शहीद हवालदार वीर मनोहर राणे (सेना मेडल) यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा संपन्न

साटेली – भेडशीत वावळेश्वर मंदिर येथे स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने शहीद हवालदार वीर मनोहर राणे (सेना मेडल) यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*साटेली – भेडशीत वावळेश्वर मंदिर येथे स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने शहीद हवालदार वीर मनोहर राणे (सेना मेडल) यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा संपन्न*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

तालुक्यातील साटेली – भेडशीत वावळेश्वर मंदिर येथे काल (१५ ऑगस्ट) सकाळी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने शहीद हवालदार वीर मनोहर राणे (सेना मेडल) यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात व गौरवाने पार पडला.
गावाचा मान, अभिमान आणि शौर्याचा तेजोमय वारसा जपणारे हवालदार राणे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी गावकरी, नातेवाईक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वावळेश्वर मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी शहीद वीराला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.
उपस्थितांच्या एकत्रित सहभागामुळे हा क्षण अधिक प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच छाया धर्णे, माजी सैनिक वासुदेव राऊळ, माजी सैनिक शिवराम राणे,माजी सैनिक अनिल देसाई,माजी सैनिक चंद्रकांत धर्णे, सरपंच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस,सदानंद धर्णे, ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत, ग्रामस्थ जयसिंग राणे, प्रभाकर राणे, प्रशांत नाईक, यशवंत धर्णे, न्हानजी राणे, चंद्रकांत राणे, संदिप धर्णे, अरुण गवंडळकर,सिध्देश धर्णे, प्रथमेश गवस, सखाराम सावंत, अमोल धर्णे, नारायण धर्णे,शशांक राणे,विलास आईर, मंजुषा राणे, प्रणाली मयेकर यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*वीर हवालदार मनोहर बाबासाहेब राणे : शौर्याचा तेजस्वी वारसा*

भारताने १५ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशची निर्मिती केली. या स्वातंत्र्ययुद्धात मराठा रेजिमेंटलच्या जवानांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यातच हवालदार मनोहर बाबासाहेब राणे (सेना मेडल) यांचे शौर्य विशेषत्वाने उल्लेखनीय ठरले.
७ डिसेंबर १९७१ रोजी झालेल्या तीव्र चकमकीत त्यांनी शत्रूच्या तळावर आघाडी घेत तीन बंकर उध्वस्त केले. या कारवाईत त्यांनी अदम्य शौर्य दाखवत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर “सेना मेडल” हा सन्मान मिळाला.
भारताच्या विजयाने १५ डिसेंबरला बांगलादेशची निर्मिती झाली, परंतु त्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना सदैव स्मरणात ठेवण्याचा संकल्प बांगलादेशानेही केला. त्याचाच भाग म्हणून २७ नोव्हेंबर २०१८ रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते हवालदार राणे यांना विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यावेळी दिलेल्या सन्मानपत्रात लिहिले होते –

“गण प्रजातंत्रात्मक बांगलादेश भारतीय सशस्त्र बलों के वीर योद्धा शहीद मनोहर राणे (सेना मेडल) को बांगलादेश के गौरवमय स्वाधीनता संग्राम १९७१ में मित्र वाहिनी सेनानी के रूप में असीम साहस के साथ युद्ध करने तथा रणभूमी में सर्वोच्च बलिदान के लिये आत्मिक कृतज्ञता व्यक्त करती है. बांगलादेश की जनता, भारतीय योद्धा को सदैव स्मरण रखेगी.”

*आजही बाबांचे शौर्य आमच्या मनात जिवंत ; साधना पाटील*

“आजही बाबांचे शौर्य आमच्या मनात जिवंत आहे. त्यांनी रणभूमीवर दिलेले बलिदान आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील असे मत साधना पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सांगितले.

वीर हवालदार मनोहर बाबासाहेब राणे यांचा हा पराक्रम व शौर्य पुढील पिढ्यांना देशभक्तीचे आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणास्थान ठरत आहे.

*शहीद हवालदार वीर मनोहर राणे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक उभारण्याची ग्रामस्थांची मागणी*

शहीद हवालदार वीर मनोहर राणे यांच्या शौर्यपूर्ण कार्याची आठवण कायम राहावी यासाठी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारतीय सेनेने कायमस्वरूपी स्मारक उभारावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी या अनावरण सोहळ्यात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!