*कोंकण एक्सप्रेस*
*अंगणवाडीतर्फे गोपाळकाला उत्साहात*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील भटवाडी नं.२च्या अंगणवाडीतर्फे गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांनी यात सहभाग घेत आनंद लुटला.
भटवाडी नं.२च्या अंगणवाडीतर्फे शिक्षणासोबतच विविध उपक्रम तसेच सणही साजरे केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गोपाळकाला साजरा करण्यात आला. अंगणवाडीच्या मुलांनी कृष्ण, राधा, गोपगोपिका, पेंद्या आदी वेशभूषा करून दहीहंडी कार्यक्रमात रंगत आणली. छोट्या कृष्णाने दहीहंडी फोडून उपस्थितांकडून वाहवा मिळविली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुलांचे पालक यांनी सहकार्य केले.