*कोंकण एक्सप्रेस*
*युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा संदीप मेस्त्री यांची निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पदी संदीप मेस्त्री यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पद भूषविले. या तीन वर्षांच्या कार्यकालात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन पुन्हा एकदा संदीप मेस्त्री यांची २०२५ – २८ पर्यंत युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही निवड जाहीर केली. पुन्हा एकदा युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने संदीप मेस्त्री यांचे कौतुक केले जात आहे.