*कोंकण एक्सप्रेस*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे पर्यावरणपूरक दहिहंडी उत्सव संपन्न*
*मुलीनी लावला थर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेत गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून इको क्लब आणि हरित सेना अंतर्गत पर्यावरणपूरक दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मुलांनी दोन थर लावून सलामी दिली.विशेष म्हणजे प्रशालेतील विद्यार्थीनींनी उत्साहपूर्ण सहभाग घेऊन दोन थर लावून दहिहंडी फोडली.आपल्या संस्कृती, परंपरा जोपासली जावी याचे धडे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना देण्याच्या उद्देशाने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे नेहमीच अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले जातात.यावेळी प्रशालेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी भक्ती सुनील परब हिने दहिहंडीची उत्कृष्ट सजावट केली होती.हा कार्यक्रमाचे नियोजन हरित सेना प्रमुख श्री.व्ही डी काणेकर यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती शितल धुरी आणि श्री राजेश धाडगा सर यांच्या सहकार्याने उत्कृष्ट केले.त्यांना प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.सुभाष सावंत सर, लिपिक श्री.कैलास घाडीगांवकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री.शामसुंदर गांवकर, श्री.महेश तांबे, श्री.जानू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंद मालणकर यांनी सहकार्य केले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वामन तर्फे यांनी कौतुक केले आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना धन्यवाद दिले.