*कोंकण एक्स्प्रेस*
*अंगणवाडीच्या बालगोपाळांनी फोडली दहीहंडी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेच्या अंगणवाडीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्साहात साजरा केला.
दरवर्षी या अंगणवाडीतर्फे श्रीकृष्णाचे पूजन करून गोपाळकाला केला जातो. यंदाही हा सण लहान मुलांच्या सहभागात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी श्रीकृष्ण, गोप-गोपिका, पेंद्या अशा प्रकारची वेशभूषा करीत गोपाळकाला खेळत दहीहंडी फोडली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अंगणवाडीसेविका स्मिता कोणेकर, मदतनीस अवनी जाधव व इतर शिक्षकांसह पालकांनी सहकार्य केले.