*कोंकण एक्स्प्रेस*
*ज्ञानमंदिरात केले श्रीकृष्णाचे पूजन*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
दरवर्षीप्रमाणे शहरातील वेंगुर्ला नं.१ या प्रशालेत गोकुळाष्टमीचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी गणेशमूर्तीकार चेतन नार्वेकर यांच्या चित्रशाळेतून वाजतगाजत श्रीकृष्णाची मूर्ती शाळेत आणण्यात आली. त्यानंतर ब्राह्मणांकरवी विधीवत पूजा होऊन आरती संपन्न झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावर आधारीत काही सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. सायंकाळी रामेश्वर भजन मंडळाचे भजन संपन्न झाले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते. आज शनिवारी साकव पुल येथे या कृष्णाचे विसर्जन करण्यात येणार आहे.