*कोंकण एक्सप्रेस*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती फेरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अमली पदार्थ विरोधी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.या अभियाना अंतर्गत आचरा पोलीस ठाणे व त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे यांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वामन तर्फे सहाय्यक शिक्षक श्री सुभाष सावंत ,श्री विष्णू काणेकर ,श्री राजेश धाडगा ,श्रीमती शितल धुरी व कचरा पोलीस ठाण्याचे हवालदार श्री सचिन करवंजे, सर्व विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थविरोधी घोषणा दिल्या. याच उपक्रमाचा भाग म्हणून अमली पदार्थ विरोधी निबंध स्पर्धा प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत एकूण 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .यात प्रथम क्रमांक कुमारी भक्ती सुनील परब .द्वितीय क्रमांक कुमारी वेदिका रवींद्र गावकर तृतीय क्रमांक कुमार राज संजय कुबल’ उत्तेजनार्थ कुमारी खुशी दिनेश लाड यांनी प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आचरा पोलीस कचरा पोलीस ठाण्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.