*कोंकण एक्सप्रेस*
*महिलेने शेजारीच राहणाऱ्या महिलेच्या मंगळसूत्राची केली चोरी : वेंगुर्ले येथील प्रकार*
*24 तासाच्या आत पोलिसांनी चोरी केली उघड*
*स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व वेंगुर्ले पोलीसांची कारवाई*
*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*
एका महिलेने शेजारीच राहणाऱ्या महिलेच्या मंगळसूत्राची केलेली चोरी अखेर उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वेंगुर्ले राजवाडा येथील अंजली भिकाजी कुबल वय ४० यांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घरातून चोरून नेले होते. या प्रकरणी काल रात्री गुन्हा दाखल होताच. आज गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि वेंगुर्ले पोलीस यांनी शिताफीने मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. राजवाडा येथील श्रीमती अनुपमा सुहास तांडेल,वय ५५ असे तिचे नाव आहे.
कुबल यांच्या घरातील बेडरूम मध्ये लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र २७ जुलै रोजी रात्री ९ ते १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० या कालावधीत चोरीस गेले होते. सर्वत्र शोधाशोध करूनही कुठेही मंगळसूत्र न मिळाल्याने कुबल यांनी बुधवारी रात्री वेंगुर्ले पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
तक्रारीची दखल घेत वेंगुर्ले पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून तपासकामात सहभाग घेतला. तपासादरम्यान राजवाडा येथील श्रीमती अनुपमा सुहास तांडेल हिने चोरी केल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला तिच्या राहत्या घरी जाऊन ताब्यात घेतले. तिच्याजवळ चोरीबाबत कसून चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा आपण केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले मंगळसूत्र वेंगुर्लेतील एका बँकेत गहाण ठेवले असे सांगितले. तत्काळ पोलिसांनी त्या बँकेत जाऊन खात्री केली असता चोरीस गेलेले मंगळसूत्र तेच असल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कुमारी नवमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे, यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ पोलीस हवालदार डाँमनिक डिसोजा, जॅक्सन घोंनसालविस, अमर कांडर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग व वेंगुर्ले पोलीस उपनिरीक्षक श्री. राठोड, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपाली मटकर, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस करत आहेत.