जिल्ह्यातील नोकरदार व व्यापारी वर्गाला दिलासा*

जिल्ह्यातील नोकरदार व व्यापारी वर्गाला दिलासा*

*कोकण Express*

*जिल्ह्यातील नोकरदार व व्यापारी वर्गाला दिलासा*

*कोल्हापुरात जाण्यासाठी कोरोना टेस्ट रिपोर्टची गरज नाही ; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यातील येणाऱ्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक असल्याचा आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल दि. ०६-०४-२०२१ रोजी निर्गमित केला होता.
कोल्हापूर शेजारच्या जिल्ह्यातील अनेक व्यापारी, नोकरदार वर्ग व्यापार , उद्योग धंदे, नोकरी अशा अनेक कारणांमुळे जिल्हांतर्गत ये जा करत असतात. आपल्या आदेशाचा अशा नागरिकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दि.०७-०४-२०२१ रोजी आपला आदेश तात्काळ मागे घेतला आहे. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातील व्यापारी व नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!