*कोंकण एक्स्प्रेस*
*राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धेत राजापूर च्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पटकाविले उपविजेते पद.*
*कासार्डे : संजय भोसले*
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी अंधेरी येथे महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन यांच्या माध्यमातून पार पडलेल्या GET SET GO (स्पर्धा वेगवान गोविंदाची) ही महिलांची 6 थरांची राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेत शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापुर ने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत, राज्यातील आघाडीच्या 8 महिला संघांनमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे. प्रथम 5 थर यशस्वी आणि जलदगतीने लावल्याने त्यांची अंतिम 4 संघान मध्ये निवड झाली. त्या नंतर अंतिम फेरीमध्ये यशस्वी वेगवान 6 मनोरे रचून त्यांनी या स्पर्धेत उपविजेते पदक पटकवले.
राजापूर सारख्या ग्रामीण भागातून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या दहीहंडी सारख्या खेळात राजापूरच्या या रणरागिनींनी राजापूर चे नाव मुंबई मध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मोठे केले आहे. या यशामुळे त्यांचं संपूर्ण राजापूर वासियांकडून कौतुक होत आहे.. शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर या मंडळाची स्थापना 2005 साली राजापूर मध्ये झाली.. त्या नंतर बरेच वर्ष रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यान मध्ये जावून आजवर या पाथकाने यशस्वी मनोरे रचले. गेल्या 8 वर्षा पासून या पथकचा मुंबई मध्ये डोंबिवली येथे सराव होतो आणि या पथकामध्ये राजपूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील विविध खेळाच्या महिला खेळाडू सरावासाठी, मुंबई येथे जात असतात. कामानिमित्त मुंबई स्थित असलेल्या सर्व महिला खेळाडू तसेच राजापूरात स्थायिक असलेल्या महिला खेळाडूंनचा देखील यात समावेश आहे.
काही वर्षापूर्वी दहीहंडी खेळ हा थरांच्या उंचीवरून विवादात आला होता, त्यानंतर महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या प्रयत्नांनी या दहीहंडी खेळाला पुन्हा एकदा चालना मिळाली आणि दहीहंडी खेळला महाराष्ट्र शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून प्रो कबड्डी प्रमाणे प्रो गोविंदा सुरू झाला आणि दहीहंडी खेळ हा व्यावसायिक पटलावर आहे. या वर्षी प्रो गोविंदा पर्व-३ ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान पार पडला परंतु त्या मधे अजून महिलाचा समावेश झालेला नाही त्यामुळेच महिलांसाठी महाराष्ट्र राज्य दहिहंडी एसोसिएशनने महिलांसाठी वेगळी स्पर्धा सुरू केली. पहिल्या वर्षी ही स्पर्धा महिलांसाठी ५ थरांची होती. प्रो गोविंदा मध्ये महिलांचा समावेश होण्यासाठी ६ थर लावणारे महिला पथक जास्तीत जास्त तयार व्हावी आणि प्रो सारख्या इवेंट मध्ये महिलांचा समावेश होण्याच्या दृष्टीने यावर्षी ६ थरांची स्पर्धा ठेवली गेली होती. या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सहभाग घेऊन या वर्षी आपल्या राजापूरच्या या महिला पथकाने यशस्वी सहा थर लावून उपविजेते पद मिळवले त्यामुळे आपल्या राजापूरच्या या महिला पथकाचा महिलांच्या या प्रो गोविंद मध्ये समावेश होण्यासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.
या मंडळातील सहाव्या थरात जाणारी गोपिका ही राजापूर कोदवली येथील प्रसिद्ध मूर्तिकार श्री. विजय मांडवकर यांची सुकन्या कुमारी. कल्याणी विजय मांडवकर ही गेले काही महिने दर शनिवार रविवार मुंबईला दहीहंडीच्या सरावासाठी जात होती. या स्पर्धेसाठी गेली. सहा महिन्यापासून आठवड्यातून दोन दिवस सर्व मुली सरावासाठी जमत होत्या. ही स्प्रधा जिंकण्यासाठी गेले काही महिने आपल्या सर्व गोपिकांना असंख्य अडचणींवर मात करून खूप मेहनत केली आहे.आणि असे या मंडळाचे संयोजक / प्रशिक्षक – प्रतिक अशोक गुरव यांनी सांगितले तसेच या स्पर्धेच्या तयारीसाठी मंडळाचे प्रयोजक राजापूर हायवे किचनचे मालक श्री संदेश भाई करंगुटकर यांनी वर्षभर या खेळाडूंना तयार करण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ दिले असे मंडळाचे मुंबई मध्ये नाव केल्या नंतर हे महिला पथक 15 ऑगस्ट रोजी पूणे येथे दहीहंडी स्पर्धे साठी जाणार आहे. आणि 16 ऑगस्ट गोपाळ काल्याच्या दिवशी यावर्षी राजापूर आणि सिंधुदुर्ग येथे या पथकाचे आगमन होणार आहे असे मंडळाच्या अध्यक्षा सौ आर्या करंगुटकर यांनी पत्रकारांना सांगितले.
पथकाच्या या सर्व यशाबद्धल बंगलवाडी रहिवासी तसेच सर्व राजापूर वासियांनी पाथकाचे कौतुक केले आणि मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.