*कोकण Express*
*कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत नियमांमध्ये शिथीलता नाही*
*पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा व्यापारी महासंघाला माहिती*
*जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत खबरदारी च्या उपाय योजना म्हणूनच काही बाबींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. जोपर्यंत जिल्ह्यातील कोरोना ची रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्बंधांवर कोणतीही शिथिलता आणता येणार नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा व्यापारी संघाच्या शिष्टमंडळास सांगितल्याची माहिती कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या च्या आदेशाला शिथिलता देण्याबाबत जिल्हा व्यापारी संघाच्या शिष्टमंडळातर्फे पालकमंत्री उदय सामंत यांची ओरोस येथे भेट घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, शिवसेना नेते सतीश सावंत, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सेक्रेटरी नितीन वाळके, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक, व्यापारी संघाचे कणकवली तालुका अध्यक्ष दिपक बेलवलकर व महासंघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांशी चर्चा करताना हे दोन महिने जिल्ह्यात शेतकरी व सर्वसामान्यांच्या दृष्टीने बेगमीचे दिवस आहेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने मिनी लॉकडाऊन मध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री व त्यांच्या सचिवांशी चर्चा करण्यात येईल. व व्यापाऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती श्री बेलवलकर यांनी दिली. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी होईपर्यंत याबाबत शिथिलता देणे शक्य होणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.