मसुरे येथे एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

मसुरे येथे एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

*कोंकण एक्स्प्रेस*

*मसुरे येथे एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम !*

*मालवण : प्रतिनिधी*

एनडीआरएफची प्राथमिक भूमिका नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना जलद आणि विशेष प्रतिसाद देणे आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ही निमलष्करी धर्तीवर संघटित आहे आणि भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील प्रतिनियुक्तीवर असलेल्या व्यक्तींनी सुसज्ज आहे. नैसर्गिक आपत्ती कोणी थांबवू शकत नाही परंतु संकटाच्या वेळी करावयाच्या उपाययोजना माहित असल्यास होणारे नुकसान कमी होऊ शकते असे प्रतिपादन एनडीआरएफचे कमांडर आर.जे. यादव यांनी येथे केले.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार आपत्तीच्या अनुषंगाने जनजागृती करून आप्पत्तीय प्रतिसाद देण्यासाठी ग्रामस्थांना सक्षम बनविणे याकरिता आर. पी. बागवे हायस्कुल मसुरे येथे प्रशिक्षण कार्यक्रम एनडीआरएफ व महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे यांनी उपस्थित मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे व एनडीआरएफ टीमचे जवान यांचे स्वागत केले. यावेळी मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे यांनी एनडीआरएफचे जवान आपत्कालीन परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्या बाबतच्या कामाचे कौतुक केले. कमांडर आर. जे. यादव यांनी भूकंप, पूर, वादळ आदी आपत्कालीन प्रसंगी माणसाचा जीव वाचावा यासाठी करावयाच्या उपाय योजना याचे जवानांच्या द्वारे प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून सुद्धा प्रात्यक्षिके करून घेतली.

यावेळी लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, तलाठी बी. बी. जाधव, एस. एल. जाधव, नवनाथ गोसावी, पोलीस पाटील सुरेखा गावकर, प्राजक्ता पेडणेकर, प्रेरणा येसजी, नंदा भांडे, कोतवाल सचिन चव्हाण, वर्षा रामाने, श्री संतोष चव्हाण, विकास पोयरेकर, रमेश पाताडे, सुनिल बांदेकर, भरत ठाकुर, समीर नाईक, ए ए भोगले, विशाखा जाधव, विवा तळाशीलकर, शशांक पिंगुळकर, अनिल मेस्त्री, प्रदीप पाटकर, बबली चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत ठाकूर यांनी तर मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंग्रे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!