*कोकण Express*
*फोंडाघाट मध्ये कोरोना लस पुन्हा केली उपलब्ध*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
पं स सभापती मनोज रावराणे यांनी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा कोरोना लससाठा उपलब्ध करून दिला असून उद्या (7 एप्रिल ) सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा लस दिली जाणार आहे. पं. स च कर्तव्यदक्ष सभापती मनोज रावराणे यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खलिफे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. डॉ खलिफे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात 200 लस पोचवल्या जातील आणि सकाळी 10 वाजल्यापासून कोरोना लसीकरण केले जाईल असे डॉ खलिफे यांनी आश्वस्त केले. फोंडाघाट येथील व्यापाऱ्यांना कोरोना लस देण्यासंदर्भात सभापती मनोज रावराणे यांनी दोनच दिवसांपूर्वी नियोजन केले होते. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बैठक घेत असतानाच डीएचओ डॉ खलिफे यांच्याशी मोबाईलवर बोलून सविस्तर चर्चा करून नंतर नियोजन केले होते. मात्र आज कोरोना लस साठा संपल्यामुळे फोंडाघाट मधील लसीकरण न झालेल्या व्यापाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला होता. याबाबत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजने आवाज उठवताच पं स सभापती मनोज रावराणे यांनी तात्काळ दखल घेत धावपळ करून डीएचओ डॉ खलिफे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ लस उपलब्ध करण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार 7 एप्रिल रोजी 200 लस आणि 8 एप्रिल रोजी आणखी 100 लस असा एकूण 300 लस साठा फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून फोंडाघाट मधील उर्वरीत व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनाही लसीकरण केले जाणार आहे. सभापती मनोज रावराणे यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.