*कोंकण एक्सप्रेस*
*सरस्वती संगीत विद्यालयातर्फे १७ रोजी गुरूवंदना*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील सरस्वती संगीत विद्यालयातर्फे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेकर सभागृहात गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कोकण गंधर्व, स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर (चिपळूण) यांचा अभंग, नाट्य व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना प्रसाद शेवडे (ऑर्गन), प्रसाद मेस्त्री (तबला), अमित मेस्त्री (हार्मोनियम), आनंद मोर्ये (पखवाज) आदी संगीतसाथ तर प्रसिद्ध निवेदक संजय कात्रे हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांच्यावतीने केले आहे.