*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत राज कदमला सुवर्णपदक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा विद्यार्थी राज कदम याने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत राज कदम याने ६० किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली. राज गेल्या अनेक वर्षापासून बॉक्सिंग चा सराव करत करीत आहे. या त्याच्या सुवर्णमय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन श्री. आर.एच.सावंत तसेच सर्व संस्था, शालेय समिती पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले.