सीताबाई – राजाराम पावसकर रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्रामार्फत कणकवलीत मिळणार मोफत सेवा

सीताबाई – राजाराम पावसकर रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्रामार्फत कणकवलीत मिळणार मोफत सेवा

*कोंकण एक्सप्रेस*

*सीताबाई – राजाराम पावसकर रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्रामार्फत कणकवलीत मिळणार मोफत सेवा*

*डॉ. सुहास पावसकर यांच्या संकल्पनेतून उपक्रम ; सामाजिक बांधिलकीतील साहित्य सेवा मोफत उपक्रमाचा शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरात गेली २७ वर्षे पावसकर क्लिनिक रुग्ण सेवा करणारे
डॉ. सुहास राजाराम पावसकर यांच्या संकल्पनेतुन गरजू रुग्णांसाठी सीताबाई – राजाराम पावसकर रुग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्राचा नुकताच रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे , डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , डॉ. सुहास पावसकर , पत्नी प्रिती पावसकर , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , ॲड. दीपक अंधारी , माजी नगराध्यक्षा मेघा गांगण , जयेंद्र म्हापसेकर , ॲड. प्रकाश पावसकर , रमाकांत पावसकर , सुप्रिया नलावडे , दिशा अंधारी , गणेश काटकर , सोनु मालविया , सौ.राठोड , अंकिता कर्पे , अनिल कर्पे , प्राजक्ता नारकर, रुपेश बांदेकर, संदीप पावसकर, विद्याधर पावसकर, सिद्धेश पावसकर,विशाल कामत , अमोल नष्टे , राजा राजाध्यक्ष , बंडू खोत, राजन पारकर, आनंद पोरे , रुपेश खाडये , राजू मानकर , डॉ. अनंत नागवेकर , डॉ. बी.जी. शेळके , डॉ. प्रशांत मोघे ,डॉ. गीता मोघे , डॉ.नितीन शेटये , डॉ. विनय शिरोडकर , डॉ. प्रविण बिरमोळे , डॉ.शमिता बिरमोळे , डॉ. स्वप्निल राणे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुहास पावसकर यांनी गेली २७ वर्षे रूग्णांना सेवा काळ-वेळ, साथ-संसर्ग किंवा अन्य कोणत्याही आरोग्यविषयक चांगली सेवा दिली आहे. डॉ. पावसकर रोटरी क्लब, आम्ही कणकवलीकर या सामाजिक संस्थांबरोबरच सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार आहे. त्यांनी आपले पावसकर क्लिनिकचे नुतनीकरण करतानाच सीताबाई – राजाराम पावसकर रुग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा दिवसेदिवस महागड्या होत असताना तात्पुरत्या वापरासाठी लागणाऱ्या रुग्णांसाठी वस्तू आता मोफत उपलब्ध होणार आहेत.

या केंद्रात फाऊलर कॉट, साधी कॉट, व्हीलचेअर, वॉकर, वॉटर बेड, एअर बेड, नेब्युलायझर, ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आणि इतर बरेच साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. गरजेनुसार रूग्णाना वापरण्यासाठी नि:शुल्क-मोफत दिले जाणार आहे. रूग्ण किंवा त्याच्या नातलगांनी सीताबाई-राजाराम पावसकर रूग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून, आपल्या आधार कार्डाची झेरॉक्स, पत्ता व संपर्क नंबराची नोंद करुन आवश्यक साहित्य वापरता येणार आहे. त्या रुग्णांनी आपली गरज संपल्यावर साहित्य सुस्थितीत केंद्रात परत जमा करणे बंधनकारक असणार आहे, त्यामुळे वरील साहित्य आवश्यक असलेल्या रुग्णांनी व नातेवाईकांनी मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहास पावसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!