*कोकण Express*
*कणकवली शाळा नंबर ३ ची जागा भालचंद्र महाराज संस्थानास देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ८ एप्रिल रोजी बैठक*
*जि. प. अध्यक्ष, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, विरोधी गटनेते यांनाही निमंत्रण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील भालचंद्र महाराज संस्थानाला तेथील शाळा क्रमांक ३ ची जागा देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ८ एप्रिल रोजी दुपारी ११.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरपंचायत विरोधी गटनेते सुशांत नाईक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी या बैठकीबाबत संबंधितांना निमंत्रण दिले असून आमदार वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात या संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीस अनुसरून पुढील कार्यवाहीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.