*मा.खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते वैभववाडी तालुका शाखेचा शुभारंभ*

*मा.खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते वैभववाडी तालुका शाखेचा शुभारंभ*

*कोंकण एक्सप्रेस*

*मा.खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते वैभववाडी तालुका शाखेचा शुभारंभ*

*ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी काढली मिरवणूक*

*वैभववाडी तालुका सह संपर्क प्रमुख पदी प्रसाद नारकर व तालुका सचिव पदी गुलजार काझी यांची नियुक्ती*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका शाखेचा उद्धाटन सोहळा शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले. यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात शिवसैनिकांनी मिरवणूक काढली. तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्सहाचे वातावरण निर्माण झाले होते. वैभववाडी शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्डयात हार अर्पण करून विकास गेला खड्डयात, महायुती सरकारचा निषेध असो, अश्या घोषणा देत पालकमंत्री यांनी जिल्ह्याच्या विकास खड्डयात घातला याचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.
यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. लोकांचा प्रतिनिधित्व करणारा आपला हक्काचा आमदार या मतदार संघातून निवडून देणे घरचेजे आहे. आता सध्याचा आपल्या जिल्ह्याचा पालकांमंत्री हा फक्त टक्केवारी वर जगणारा आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या टक्केवारीची काळजी आहे लोकांच्या हिताची किव्हा जिल्ह्याच्या विकासाची काही पडलेली नाही आहे. आज दुर्दैवाने महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली आहे महायुती सरकार मधील हे मंत्री राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत. तरी देखील या अश्या कलंकित मंत्र्यांना मंत्रिपदावरून काढून टाकले जात नाही आहे. विकासकामे करण्यासाठी महायुती सरकार कडे पैसे नाही आहेत पण या भ्रष्टाचारी मंत्र्यांना द्यायला सरकार कडे पैसे आहेत. वैभववाडी येथील रेल्वे फाटक येथील भुयारी मार्ग माझ्या प्रयत्नातून मंजूर करून घेतला, मध्ये प्रमोद जठार टीनकी मिरवतात. पण गेली २ वर्षे झाली एक भुयारी मार्ग यांना पूर्ण करता येत नाही अशी या सरकारी अवस्था आहे.
अरुणभाई दूधवडकर म्हणाले, हिंदू धर्मानुसार म्हटलं तर आज अंगारकी चतुर्थी आज या शुभ दिनी आपल्या वैभववाडी शाखेचा शुभारंभ झाला. मी गणपतीचरनी प्रार्थना करतो की माझ्या वैभववाडी तालुक्याचे गेलेल वैभव या शाखेच्या माध्यमातून परत मिळूदे. आज तालुक्यातील कार्यकर्त्यांमधील चांगले उत्साहाचे वातावरण आहे.
बाळ माने म्हणाले, वैभववाडी तालुक्याच न्हवे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गतवैभव पुन्हा एकदा शिखरावरती आणण्याकरता आज हे कार्यालय आज या ठिकाणी सुरु होतंय आणि त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आता जोमाने काम करणे गरजेचे आहे. कोकण हा एकेकाळी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला होता परंतु कधी कधी चंद्र सूर्याला देखील ग्रहण लागत त्यामुळे हे लागलेलं ग्रहण आता संपलं आहे. चांगल्या प्रकारचे कार्यालय आता वैभववाडी येथे सुरु झालाय. जे गेले ते कावळे व आता राहिलेत ते कटवत शिवसेनेचे मावळे असे यावेळी उद्दार शिवसेना उपनेते बाळ माने यांनी काढले.
संदेश पारकर म्हणाले, शिवसेनेच्या वैभववाडी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्धाटन आज याठिकाणी संपन्न झाले. खऱ्या अर्थाने शिवसेनेचा एक झंजावत आज परत या शाखेच्या शुभारंभ प्रसगी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे वैभव निर्माण झालं पाहिजे मग सामान्य कार्यकर्ता हा कुठेतरी त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळेल आता होणारी निवडणूक ही पदाधिकाऱ्यांची नसून स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. म्हणून आता पासून कामाला लागा व येणाऱ्या निवडणूक जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवूया.
सतीश सावंत म्हणाले, आज वैभववाडी तालुक्याच्या शाखेचा शुभारंभ संपन्न झाला. खऱ्या अर्थाने आहे एका समाज मंदिरासमोर दुसऱ्या समाजसेवा करणाऱ्या शाखेचे उद्धाटन होतय. आज वैभववाडी तालुक्यातील जरी काही पदाधिकारी गेले असतील तरी बाळासाहेबांच्या विचारांचा खरा निष्ठावंत शिवसैनिक आज तालुक्यात आहे हे आज दिसून आले. सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम या वैभववाडी शाखेच्या माध्यमातून आपण करा. असे यावेळी सतीश सावंत म्हणाले.
नीलम पालव म्हणाले, आज शिवसेना सचिव माजी खासदर विनायक राऊत यांच्या हस्ते या वैभववाडी तालुक्याच्या शाखेचे शुभारंभ संपन्न झाला. शिवसेनेच्या ब्रीद वाक्यानुसार 80% समाजकारण व 20 % राजकारण या हेतुने गोरगरीब जनतेचे प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून आपला शिवसैनिकांनी करावे असे यावेळी नीलम पालव म्हणाले.
सुशांत नाईक म्हणाले, आज वैभववाडी तालुक्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ढोल ताश्यांच्या मिरवणुकीला शिवसैनिकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, गोरगरीब जनतेची कामे या शाखेच्या मध्यनातून केली जातील. काही लोक बोलत होते की वैभववाडीतील शिवसेना संपली पण आज जमलेल्या या गर्दीने पुन्हा दाखवून दिले की तळागळातील शिवसैनिक कार्यकर्ता अजून ठाम आहे. काही बोल बच्चन पदाधिकारी, सरपंच जरी गेले असतील तरी शिवसेनेचा खरा कार्यकर्ता हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. वैभववाडी तालुक्यातील बरेच प्रश्न प्रलंबित आहेत यात स्मार्ट मीटर, रस्ते,महाविद्यालय यावर जिल्ह्याचे पालकमंत्री चकार शब्द काढत नाही आहेत. लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 18 हजार नवीन मतदार वाढले असून हे सर्व 18 हजार मतदान नितेश राणे यांनाच झाले यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वोटिंग चोरीचा प्रकार झाला असल्याचे चित्र स्पष्ट होते. जिल्ह्याचे खासदार हे आता विमान सेवा चालू करण्यासाठी पत्र देत आहेत पण विमानसेवा काय जिल्ह्यातून सुरु होत नाही आहे. आता राणे यांना तिकडे कोकणी माणसाच्या प्रथेनुसार कोंबडा द्यावा लागेल असा टोला यावेळी नाईक यांनी लगावला. आताच पालकमंत्री राणे यांनी वैभववाडी तालुक्यातील नापने धबधब्यावर काचेचा पूल उभारला, पण खरे तर राणे कुटुंबीयांची नापने येथे 33 एकर जमिन आहे. स्वतः च्या जमिनीला भाव मिळण्यासाठी हा सगळा खटाटोप पालकमंत्री राणे यांनी केला आहे. जिथे स्वताची जागा तिथे विकास असा गेली कित्येक वर्षे राणे कुटुंबाचा धंधा चालू आहे.ज्या पद्धतीने कणकवली येथे टॉकीज चा रस्ता वर्ग करण्यात आला, आपल्या घरी जाणारा रस्ता सरकारी पैश्यातून करण्यात आला अश्याच पद्धतीचा फायदा पहिले नारायण राणे व आता पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत असा टोला यावेळी नाईक यांनी लगावला.
यावेळी माजी खासदार विनायक राउत यांच्या हस्ते तालुका सह संपर्क प्रमुख पदी प्रसाद नारकर व तालुका सचिव पदी गुलजार काझी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू शिंदे व आभार संदीप सरवनकर यांनी मानले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर,तालुका प्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी तालुका प्रमुख रवींद्र चव्हाण मनसे उपजिल्हा प्रमुख सचिन तावडे, महेश कदम, रुपेश वारंग,माजी तालुका सभापती लक्ष्मण रावराणे, तालुका संपर्क प्रमुख विठ्ठल बंड, वैभववाडी सहसंपर्क प्रमुख- प्रसाद नारकर,अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मज्जीद बटवाले, महिला आघाडी प्रमुख- नलिनी पाटील, महिला तालुका संघटक- दिव्या पाचकुडे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटणकर,युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, तालुका सचिव गुलजार काझी, उपमाहिला तालुका संघटक रिहाना काझी, विभाग प्रमुख जितू तळेकर,यशवंत गवाणकर,सूर्यकांत परब, सूर्यकांत परब,दीपक पवार, विलास पावसकर, अशोक रावराणे, बाबा मोरे, जनार्दन विचारे राजेश तावडे, अरुण माळकर दीपक चव्हाण,अनिल नाराम,श्रीकांत ढापले, महिला शहर अध्यक्ष मानसी सावंत, अमित कुडतरकर, रवींद्र रावराणे, आदी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!