*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई गोवा महामार्ग रोखला*
*सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा. आ. वैभव नाईक व शिवसेना शिष्टमंडळासमवेत घेतली बैठक*
*रखडलेल्या महामार्गाबाबत ना. नितीन गडकरी यांच्याशी झाली फोनवर चर्चा*
*प्रलंबित कामाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन महामार्ग पूर्ण करण्याचे ना. गडकरी यांचे आश्वासन*
गेली अकरा वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि महामार्गावर पडलेल्या खड्डयांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई गोवा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व जिल्हावासियांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता आदोलकांनी रस्त्यावर बसून सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत मा. आ. वैभव नाईक यांच्यासह इतर नेते व कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाला ओरोस येथे बोलावून घेत त्यांच्यासमवेत बैठक घेतली. तसेच यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर चर्चा करून शिवसेना शिष्टमंडळाची मागणी त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांनीही ना. नितीन गडकरी यांच्याशी रखडलेल्या महामार्गाबाबत फोनवर चर्चा केली. त्यावर ना. गडकरी यांनी प्रलंबित कामाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू असे आश्वासित केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर,जि. प. सीईओ रवींद्र खेबुडकर, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे आदि अधिकारी उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल पासून ते बांद्यापर्यंत सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत.गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग पूर्ण करणार असे भाजप महायुती सरकारने आश्वासन दिले होते. मात्र यावर्षीचा गणेशोत्सव आला तरी देखील महामार्ग पूर्ण झाला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.आवाज कुणाचा शिवसेनेचा! या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय! हायवे आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा! अशा घोषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थित जनसमुदायास शिवसेना नेत्यांनी संबोधित केले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन वैभव नाईक व शिवसेना नेत्यांशी चर्चा केली.
याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु होऊन ११ वर्षे झाली तरी देखील हा महामार्ग पूर्ण झाला नाही. महामार्गावर झालेल्या अपघातात ४ हजार कोकण वासियांचे बळी गेले आहेत. आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार हे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी १५ ऑगस्ट पूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवू असे सांगितले. त्याप्रमाणे आमच्या आंदोलन स्थळावरील खड्डे चार दिवसापूर्वी बुजविले मात्र आज पुन्हा याठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही थुक पट्टी केली तरी तुमचे चेहरे, तुमचे विचार खड्यांच्या निमित्ताने आज रस्त्यावर दिसत आहेत अशी टीका वैभव नाईक यांनी केली.
मुंबई गोवा हायवे अपूर्ण ठेवणाऱ्या भाजप महायुती सरकारचा जाहीर निषेध, महामार्गाबाबत फसव्या डेडलाईन देणाऱ्या भाजप महायुती सरकारचा जाहीर निषेध,मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा,कोकण वासीयांना खड्यात घालणाऱ्या भाजप महायुती सरकारचा जाहीर निषेध,रखडलेला मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार?महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप महायुती सरकारचा जाहीर निषेध, अपघातात ४ हजार बळी गेलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सरकार अजून किती बळी घेणार? अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले.
आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कन्हैया पारकर, राजन नाईक, मंगेश लोके, बबन बोभाटे,चंद्रकांत कासार, संतोष शिरसाट,बाबी जोगी, जयभारत पालव,अतुल बंगे, बंडू ठाकूर, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, पराग नार्वेकर, पप्पू परुळेकर, मंदार गावडे,मंदार ओरसकर, राजू राठोड, गणेश गावकर, उत्तम लोके, अमित भोगले,सुशील चिंदरकर,राजू कविटकर, अवधूत मालणकर, दीपा शिंदे, वैदेही गुडेकर,स्नेहा दळवी, माधवी दळवी,संजना कोलते, निनाक्षी मेथर, जान्हवी पालव,अस्मिता गावडे, पूनम पवार,कन्याश्री मेस्त्री,सोनाली सावंत, मंदा जोशी, रुपेश आमडोस्कर,संदीप सावंत, गुरु सडवेलकर, नरेंद्र राणे,नागेश ओरोसकर,महेश जावकर,बंडू चव्हाण, समिर लब्दे, विजय पालव,शिवा भोजने, पिंटू उभारे, एकनाथ धुरी, अमित राणे, भगवान लुडबे, लता खोत, शुभम मठकर, समीर पालव, बाळू पालव, संदीप हडकर सचिन ठाकूर, संदीप म्हाडेश्वर,गुरू गडकर,अश्पाक कुडाळकर, यज्ञेश गोडे, महेंद्र म्हाडगुत, सत्यवान कांबळी,प्रदीप गावडे,पप्पू म्हाडेश्वर, मंगेश बांदेकर,वंदेश ढोलम, राहुल सावंत, तेजस राणे, धीरज मेस्त्री,सिद्धेश राणे, नितेश भोगले, सुहास पेडणेकर,आयवान फर्नांडिस, इमाम नावलेकर, जयदेव लोणे, रवी मिटकर,गणपत आडिवरेकर, मनोज मोंडकर, विशाल सरमळकर, राहुल जाधव,पिंटू दळवी, अमित फोंडके, सुनील सावंत, स्वप्नील पुजारे,राजू घाडीगांवकर,स्वप्नील शिंदे, सिद्धेश मांजरेकर, रूपम टेमकर, प्रसाद चव्हाण, गौरव वेर्लेकर यासंह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व जिल्हावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.