*‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने ध्वजवंदन व* *स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन*

*‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने ध्वजवंदन व* *स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन*

*कोंकण एक्सप्रेस*

*‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने ध्वजवंदन व* *स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जनजागृती हेतू समोर ठेवून भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला मंडलाच्या वतीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ध्वजवंदनासोबतच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सकाळी सर्वप्रथम वेंगुर्ला येथील स्वातंत्र्य सैनिक स्मारकाजवळ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदजी चव्हाण यांच्या हस्ते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण जागवली. उपस्थितांनी या वेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय केले.

भाजपा तालुका कार्यालयाच्या बाहेर तिरंगा फडकावण्यात आला. पावसाच्या सरींमध्येही कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उत्साहाने सहभागी झाले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले आणि देशभक्तीपर संदेश देण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा वेंगुर्ला मंडलाचे अध्यक्ष विष्णू चंद्रकांत परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , प्रदेश निमंत्रीत सदस्य शरदजी चव्हाण , माजी मंडल अध्यक्ष सुहासजी गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर , महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा निमंत्रीत राजनजी गिरप, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, ईशा मोंडकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , प्रभाकर गावडे ,अर्जुन बापू तांडेल , मानसी परब , सत्यवान पालव, निलेश गवस, संजय केणी , प्रदीप मुळीक, देवेंद्र उर्फ बाळू वस्त , सीताराम साळगावकर, किशोर रेवणकर, वसंत गावडे, मधुकर कृष्णा गावडे, विकास चव्हाण आदी पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या, तसेच अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. ‘हर घर तिरंगा’ अभियानाद्वारे प्रत्येक नागरिकाच्या घरावर तिरंगा फडकवून देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!