*कोंकण एक्सप्रेस*
*हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत कणकवली नगरपंचायत कडून शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत कणकवली नगर पंचायत कडून मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरपंचायत कार्यालय कडून तिरंगा बाईक रॅली सुरवात होऊन पटकी देवी मंदिर, बाजारपेठ मार्गे कणकवली रेल्वे स्टेशनं व तेथून पुन्हा कणकवली नगरपंचायत अशी रॅली काढण्यात आली यावेळी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वातावरण निर्मिती व जनजागृती करण्यात आली . यावेळी मनोज धुमाळे, प्रशांत राणे,सोनाली खैरे, सचिन तांबे,अक्षता रोळे ,अमोल भोगले, संतोष राणे ,संदीप मुसळे, प्रवीण गायकवाड, रवी महाडेश्वर, राजेश राणे, निकिता पाटकर ,ज्योती देऊळकर यांच्यासह अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते