*कोंकण एक्सप्रेस*
*महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट*
*कोकणातील विकासकामे, लोक-कल्याणकारी उपक्रम व विविध योजनांविषयी झाला संवाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सौ. निलम ताई राणे यांच्या उपस्थितीत खासदार नारायणराव राणे यांनी हमसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान यावेळी कोकणातील विकासकामे तसेच लोककल्याणकारी उपक्रम आणि आगामी योजनांविषयी संवाद झाला.