*कोंकण एक्स्प्रेस “
*मालवण दांडी झालझुलवाडी येथे सौ. जान्हवी जयदेव लोणे यांना आढळला दुर्मिळ समुद्री पक्षी ‘मास्कड बुबी’*
*मालवण ः प्रतिनिधी*
पक्षी जगतात दुर्मिळ समजला जाणारा मास्कड बुबी हा समुद्री पक्षी मालवण-दांडी झालझुलवाडी येथील समुद्राच्या लाटांबरोबर वाहून समुद्र किनारी आल्यानंतर स्थानिक मच्छिमार महिला सौ. जान्हवी जयदेव लोणे व कु. दिक्षा लोणे ह्यानी त्या पक्षाची माहिती युथ बिट्स फॉर कलायमेंट संस्थेला दिल्यानंतर त्यांनी तो पकडून सुरक्षितरित्या वनखात्याच्या ताब्यात दिला आहे
मालवण-दांडी झालझुलवाडी येथे सोमवारी सायंकाळी सौ. जान्हवी जयदेव लोणे व कु. दिक्षा लोणे ह्या समुद्रावर गेले असता समुद्राच्या लाटांमधून एक पक्षी किनाऱ्याकडे वाहत आल्याचे निदर्शनास आला. यावेळी श्री.नारायण लोणे व कु. भावेश लोणे हे त्या पक्षाच्या जवळ गेले असता तो पक्षी उडू शकत नव्हता.
सौ. लोणे यांनी लगेच युथ बिट्स फॉर कलायमेंट संस्थेशी संपर्क केला असता अक्षय रेवंडकर व ईकोमेट्सचे सदस्य भार्गव खराडे हे त्याठिकाणी तातडीने पोहोचले व तो पक्षी मास्कड बुबी आहे असे समजले. त्यानंतर दर्शन वेंगुर्लेकर यांनी वनविभागास फोन करून त्याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर युथ बिट्स फॉर कलायमेट या संस्थेच्या ऑफिसमध्ये संस्थेच्या उपाध्यक्ष स्वाती पारकर व ईकोमेट्सचे सदस्य अनिता पारकर व मनिषा पारकर यांनी पिंजरा जोडल्यानंतर अक्षय रेवंडकर याने मास्कड बुबीला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले. तो पक्षी दमलेला असल्यामुळे दोन्ही पंखाच्या आत पाठीवर मान घालून विश्रांती घेत होता. त्यानंतर अक्षय रेवंडकर व भार्गव खराडे यांनी सुखरूप त्यास वनविभागाच्या ताब्यात दिले आहे .